मलेशिया, सिंगापूरमध्ये पाडवा
By admin | Published: March 31, 2015 03:30 AM2015-03-31T03:30:14+5:302015-03-31T04:33:37+5:30
मायभूमीपासून कितीही लांब राहिले तरी तिथल्या चालीरीती आणि उत्सव साजरे करण्यात परदेशस्थ भारतीय नागरिक मागे राहात नाहीत.
मुंबई : मायभूमीपासून कितीही लांब राहिले तरी तिथल्या चालीरीती आणि उत्सव साजरे करण्यात परदेशस्थ भारतीय नागरिक मागे राहात नाहीत. त्यात तो मराठी असेल तर गणपती, गुढीपाडवा यासारखे उत्सव साजरे करतोच करतो. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात मलेशिया, सिंगापूरमध्ये झालेल्या नववर्ष स्वागत सोहळ्यातही ‘जय जय महाराष्ट्र माझा’चा गजर झाला़
गुढीपाडव्याचे औचित्य साधून मलेशियातील महाराष्ट्र मंडळाने शनिवारी (२८ मार्च) नववर्ष स्वागत सोहळा आयोजिला होता़ कुआलालंपूर येथील लक्ष्मीनारायण मंदिर हॉलमध्ये मंडळाचे संस्थापक सदस्य नारायण नायक व मीना नायक यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली़ जय जय महाराष्ट्र माझा़़़ या गीताने विदेशात महाराष्ट्राचा जयजयकार झाला़ महाराष्ट्राची लोकधारा हा विशेष सोहळाही देखणा होता़ (प्रतिनिधी)