पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 16:38 IST2025-04-24T16:37:15+5:302025-04-24T16:38:02+5:30

Pakistan Closes Airspace, Bans Trade: भारताने सिंधू नदीचे पाणी रोखले आहे. पाकिस्तानने भारताच्या या पावलाला कसे तोंड द्यायचे यासाठी एनएससीची बैठक बोलविली होती. या बैठकीत पाकिस्तानने दोन निर्णय घेतले आहेत. 

Pahalgam Attack: 'Holding water is like war', Pakistan closes its airspace, trade to India | पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

भारताने सिंधू नदीचे पाणी रोखल्याने पाकिस्तानची शेती करपून जाणार आहे. तसेच प्रचंड दुष्काळ पडणार आहे. यामुळे आधीच भिकेला लागलेल्या पाकिस्तानची आर्थिक अवस्था भीषण होणार आहे. यावरून पाकिस्तानने भारताच्या या पावलाला कसे तोंड द्यायचे यासाठी एनएससीची बैठक बोलविली होती. या बैठकीत पाकिस्तानने दोन निर्णय घेतले आहेत. 

मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे भारताने पाकिस्तान या दहशतवाद्यांना लाँचिंग पॅड, शस्त्रे उपलब्ध करून देत असल्याचा आरोप केला आहे. तसेच आयएसआय या दहशतवाद्यांमागे असल्याचा आरोप केला आहे. पाकिस्तानविरोधात कारवाई करण्यात आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात सिंधु नदीचे पाणी रोखण्यात आले आहे. तसेच पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच देश सोडण्याचा आदेश दिला आहे. पाकिस्तानी राजदुतांनाही आठवड्याचा अवधी देण्यात आला आहे. याला प्रत्यूत्तर म्हणून पाकिस्तानने देखील पाऊले उचलली आहेत. 

पाकिस्तानच्या एनएससी बैठकीत भारताने अद्याप दहशतवादी हल्ल्याचे पुरावे पाकिस्तानला दिलेले नाहीत, असे म्हटले आहे. तसेच पाणी रोखणे म्हणजे युद्धासारखीच कारवाई असल्याचा आरोप केला आहे. भारत हवाई हल्ला करू शकतो, यामुळे भारतीय प्रवासी विमानांना ये-जा करण्यासाठी हवाई क्षेत्र बंद केले आहे. याचबरोबर पाकिस्तानने भारतासोबतच्या सर्व व्यापारावर बंदी घातली आहे. पाकिस्तानने वाघा बॉर्डरही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर शिमला करारही निलंबित करण्यात आला आहे. तसेच शीख धार्मिक तीर्थयात्री सोडून जे भारतीय आहेत, त्याचा व्हिसा देखील रद्द करण्यात येत आहे. या लोकांनी ४८ तासांत पाकिस्तान सोडावे असे आदेश देण्यात आले आहेत. 

जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी

दरम्यान, भारतीय परराष्ट्र खात्याने पाकिस्तानात असलेल्या भारतीयांना लवकरात लवकर मायदेशी येण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पाकिस्तानींना देखील भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. २९ एप्रिलनंतर मेडिकल व्हिसादेखील कार्यरत राहणार नाही, असे सांगितले आहे. इतर प्रकारचे व्हिसा २७ एप्रिलपासूनच रद्द होणार आहेत. एकंदरीतच भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती आहे. 

Web Title: Pahalgam Attack: 'Holding water is like war', Pakistan closes its airspace, trade to India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.