पृथ्वीच्या पोटात दुखतंय... उंच इमारतींना धोका! तापमान वाढीमुळे जमिनीचे आकुंचन-प्रसारण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 09:55 AM2023-07-31T09:55:49+5:302023-07-31T09:56:52+5:30
तापमानवाढीने इमारतींचा पाया कमकुवत होऊन इमारतींना तडे जाऊ शकतात. त्यामुळे त्या पडण्याचा धोका धोका वाढतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
न्यूयॉर्क : विविध नैसर्गिक आपत्तीच्या रूपाने हवामान बदलाचे फटके बसायला लागल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे. पृथ्वीचे तापमान झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पृथ्वीचे ‘पोट’ बिघडले आहे, अर्थात भूगर्भातही हवामान बदलामुळे आमूलाग्र बदल होत आहेत. त्यामुळे शहरांमध्ये बांधण्यात येत असलेल्या बहुमजली इमारतींना धोका निर्माण झाला आहे.
तापमानवाढीने इमारतींचा पाया कमकुवत होऊन इमारतींना तडे जाऊ शकतात. त्यामुळे त्या पडण्याचा धोका धोका वाढतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
१२ मिमीपर्यंत शिकागो शहराची जमीन तापमान वाढीमुळे प्रसरण पावली आहे.
०८ मिमीपर्यंत जमीन बहुमजली इमारतींखालील आकसली गेल्याने, हा बदल खूपच धोकादायक आहे.
तळघर, पार्किंग, बोगदे धोकादायक -
तळघर, पार्किंग गॅरेज, बोगदे आणि रेल्वेगाड्या सतत उष्णता निर्माण करतात. तापमानात वाढ झाल्यामुळे जमिनीत बदल होत आहेत. आमची एकही नागरी संरचना किंवा पायाभूत सुविधा या बदलासाठी तयार नाही.
संशाेधन कुठे?
- संशोधक लोरिया आणि त्यांच्या टीमने जमिनीच्या वर आणि खाली तापमानाचा अभ्यास केला.
- यासाठी त्यांनी शिकागो शहराचा प्रयोगशाळा म्हणून वापर केला. यासाठी शिकागोच्या अनेक भागात सेन्सर स्थापित करण्यात आले होते.
खेड्यांपेक्षा शहरे तापली
शास्त्रज्ञांच्या मते, शहरे खेड्यांपेक्षा जास्त गरम असतात. कारण शहरांच्या इमारती बनवण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल सौरऊर्जा आणि उष्णता शोषून घेतो. नंतर ते वातावरणात सोडतो. या प्रक्रियेचा अनेक वर्षांपासून अभ्यास केला जात आहे.