पाकने काश्मिरींना चिथवावे -मुशर्रफ

By admin | Published: October 17, 2014 10:39 AM2014-10-17T10:39:56+5:302014-10-17T10:42:01+5:30

पाकिस्तानचे माजी लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांनी भारताविरुद्ध पुन्हा गरळ ओकली असून काश्मिरात लढत असलेल्यांना पाकने चिथावणी देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

Pak kashmiri khathwaewe - musharraf | पाकने काश्मिरींना चिथवावे -मुशर्रफ

पाकने काश्मिरींना चिथवावे -मुशर्रफ

Next
>इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांनी भारताविरुद्ध पुन्हा गरळ ओकली असून  काश्मिरात लढत असलेल्यांना पाकने चिथावणी देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
पाक लष्कराशिवाय काश्मिरात आमचा आणखी एक स्रोत असून तो म्हणजे भारताविरुद्ध लढणारे तेथील लोक. आम्ही त्यांना केवळ चिथावणी देण्याची गरज आहे, असे मुशर्रफ म्हणाले.
देशद्रोहाच्या खटल्यामध्ये सध्या जामिनावर असलेले मुशर्रफ एका टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
लष्कर भारतासोबत युद्ध करण्यास तयार असून पाकमधील एक लाख लोकदेखील काश्मीरसाठी लढू इच्छितात. पाक प्रत्युत्तर देऊच शकणार नसल्याच्या भ्रमात भारताने राहू नये, असे मुशर्रफ म्हणाले.
१९९९ मध्ये कारगिल संघर्षानंतर लगेचच मुशर्रफ यांनी पाकची सत्ता हस्तगत केली होती. काश्मिरात आम्ही भारतीय लष्कराशी समोरून तद्वतच मागून अशा दोन्ही बाजूंनी लढू शकतो, असे त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
 
 
सीमेवर सुरू असलेल्या संघर्षाबाबत छेडले असता ते म्हणाले की, आम्ही एका गालावर चापट मारल्यानंतर दुसरा गाल पुढे करणार्‍यांपैकी नाही. आम्ही जशास तसे प्रत्युत्तर देऊ शकतो. एखादा देश आतून कमकुवत असेल तरच बाह्य आक्रमण होऊ शकते. आपण अंतर्गतरीत्या मजबूत राहिलो तर आपल्याशी खेटण्याची कोणीही हिंमत करू शकणार नाही. मोदी हे मुस्लिम आणि पाकिस्तानविरोधी आहेत. त्यांच्यात काहीही बदल झालेला नाही. आपली समस्या ही आहे की, आम्ही त्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतो. आम्ही आपली प्रतिष्ठा जपायला हवी. (वृत्तसंस्था)

Web Title: Pak kashmiri khathwaewe - musharraf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.