पाकने काश्मिरींना चिथवावे -मुशर्रफ
By admin | Published: October 22, 2014 05:08 AM2014-10-22T05:08:47+5:302014-10-22T05:08:47+5:30
पाकिस्तानचे माजी लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांनी भारताविरुद्ध पुन्हा गरळ ओकली असून काश्मिरात लढत असलेल्यांना पाकने चिथावणी देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांनी भारताविरुद्ध पुन्हा गरळ ओकली असून काश्मिरात लढत असलेल्यांना पाकने चिथावणी देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
पाक लष्कराशिवाय काश्मिरात आमचा आणखी एक स्रोत असून तो म्हणजे भारताविरुद्ध लढणारे तेथील लोक. आम्ही त्यांना केवळ चिथावणी देण्याची गरज आहे, असे मुशर्रफ म्हणाले.
देशद्रोहाच्या खटल्यामध्ये सध्या जामिनावर असलेले मुशर्रफ एका टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
लष्कर भारतासोबत युद्ध करण्यास तयार असून पाकमधील एक लाख लोकदेखील काश्मीरसाठी लढू इच्छितात. पाक प्रत्युत्तर देऊच शकणार नसल्याच्या भ्रमात भारताने राहू नये, असे मुशर्रफ म्हणाले.
१९९९ मध्ये कारगिल संघर्षानंतर लगेचच मुशर्रफ यांनी पाकची सत्ता हस्तगत केली होती. काश्मिरात आम्ही भारतीय लष्कराशी समोरून तद्वतच मागून अशा दोन्ही बाजूंनी लढू शकतो, असे त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)