भारत-अमेरिका संबंधाने पाक अस्वस्थ

By admin | Published: June 10, 2016 04:49 AM2016-06-10T04:49:14+5:302016-06-10T04:49:14+5:30

भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधात सुधारणा होत असताना तिकडे पाकिस्तानची धडधड मात्र वाढली आहे.

Pak-Pak relations with Indo-US relations | भारत-अमेरिका संबंधाने पाक अस्वस्थ

भारत-अमेरिका संबंधाने पाक अस्वस्थ

Next


इस्लामाबाद : भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधात सुधारणा होत असताना तिकडे पाकिस्तानची धडधड मात्र वाढली आहे. अमेरिकेला जेव्हा आमची गरज असते तेव्हा ते आमच्यासोबत चांगले संबंध ठेवतात आणि गरज नसते तेव्हा आमची साथ सोडली जाते, असेही पाकिस्तानने म्हटले आहे.
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे सल्लागार सरताज अजीज याबाबत बोलताना म्हणाले की, द्विपक्षीय संबंधाच्या मुद्यावर पाकिस्तान अमेरिकेजवळ आपली चिंता व्यक्त करणार आहे. दोन्ही देशांत येथे उच्चस्तरीय बैठक घेण्याबाबत विचार सुरू आहे. अजीज यांचा हवाला देत ‘डॉन’ने हे वृत्त दिले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये सुरक्षा सहकार्याबाबत महत्त्वपूर्ण करार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अजीज यांचे हे वक्तव्य आले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी एनएसजी सदस्यत्वासाठी भारताला जे समर्थन दिले आहे, त्यामुळेही पाकिस्तान नाराज असल्याचे सांगितले जात आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Pak-Pak relations with Indo-US relations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.