पाक पंतप्रधान आज चीन दौ-यावर
By admin | Published: November 7, 2014 04:14 AM2014-11-07T04:14:42+5:302014-11-07T04:14:42+5:30
पंतप्रधान नवाज शरीफ शुक्रवारी चीनच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंधांना बळकटी येईल व काही नव्या करारांवर स्वाक्षऱ्या होतील. यातील बहुतेक करार हे ऊर्जा क्षेत्राशी संबंधित असतील.
Next
इस्लामाबाद : पंतप्रधान नवाज शरीफ शुक्रवारी चीनच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंधांना बळकटी येईल व काही नव्या करारांवर स्वाक्षऱ्या होतील. यातील बहुतेक करार हे ऊर्जा क्षेत्राशी संबंधित असतील.
गेल्या सप्टेंबर महिन्यात चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा दौरा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर शरीफ यांचा हा दौरा होत आहे. तेव्हा पाकिस्तानात राजकीय वातावरणात अस्वस्थता असल्यामुळे चीनच्या राष्ट्रपतींचा दौरा रद्द करावा लागला होता. तेव्हा शरीफ यांनी जिनपिंग यांच्या दौऱ्यात आम्हाला ३४ अब्ज डॉलरचे करार होण्याची आशा होती, असे म्हटले होते. (वृत्तसंस्था)