पान१-पाकची युनोकडे कागाळी मोदी-शरीफ चर्चेची शक्यता धूसर : योग्यवेळी भारत देणार उत्तर नवा वाद : युनोला पाठविलेल्या पत्रात पाकचा आरोप
By admin | Published: September 25, 2015 09:55 PM2015-09-25T21:55:56+5:302015-09-25T21:55:56+5:30
संयुक्त राष्ट्र/न्यूयॉर्क : नियंत्रण रेषेवर भिंत बांधण्याची भारताची योजना असल्याची तक्रार पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राकडे (युनो) केली आहे. नियंत्रण रेषेवर भिंत उभारणे युनोच्या ठरावाविरुद्ध असून असे करून नियंत्रण रेषेलाच आंतरराष्ट्रीय सीमेत रूपांतरित करण्याचा भारताचा प्रयत्न असल्याचा दावाही पाकने केला आहे. दरम्यान, भारताने याला आपण योग्य वेळी उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया भारताने व्यक्त केली. पाकच्या या पत्रप्रपंचाने युनोच्या आमसभेदरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांची स्वतंत्र बैठक होण्याची शक्यता धूसर झाली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे पंतप्रधान येथील वाल्डोर्फ एस्टोरिया या एकाच हॉटेलमध्ये मुक्कामास आहेत. पण युनोच्या आमसभेत दोघांचीही तोंडे दोन दिशांना राहण्याची लक्षणे दिसू लागली आहेत.
Next
स युक्त राष्ट्र/न्यूयॉर्क : नियंत्रण रेषेवर भिंत बांधण्याची भारताची योजना असल्याची तक्रार पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राकडे (युनो) केली आहे. नियंत्रण रेषेवर भिंत उभारणे युनोच्या ठरावाविरुद्ध असून असे करून नियंत्रण रेषेलाच आंतरराष्ट्रीय सीमेत रूपांतरित करण्याचा भारताचा प्रयत्न असल्याचा दावाही पाकने केला आहे. दरम्यान, भारताने याला आपण योग्य वेळी उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया भारताने व्यक्त केली. पाकच्या या पत्रप्रपंचाने युनोच्या आमसभेदरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांची स्वतंत्र बैठक होण्याची शक्यता धूसर झाली आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे पंतप्रधान येथील वाल्डोर्फ एस्टोरिया या एकाच हॉटेलमध्ये मुक्कामास आहेत. पण युनोच्या आमसभेत दोघांचीही तोंडे दोन दिशांना राहण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. भिंत बांधण्याबाबतच्या आरोपावर भारताने लगेचच थेट प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, लोधी यांनी ४ आणि ९ सप्टेंबरला पाठविलेल्या या पत्रातील मजकुरातच विरोधाभास असल्याचे म्हटले आहे. शिवाय पाकिस्तानने सुरक्षा परिषदेला दिलेल्या पत्रांपैकी एक पत्र हिज्बुल मुजाहिदीनचा प्रमुख सईल सलाउद्दीन याच्या वक्तव्यावर आधारलेले असल्याकडे भारताने नेमकेपणाने लक्ष वेधले आहे. हे पत्र सलाउद्दीनच्या वक्तव्यावर आधारलेले आहे. सलाउद्दीनला आम्ही दहशतवादी मानतो. दुसरे पत्र चार सप्टेंबरला लिहिले असून त्यात कोणतीही द्विपक्षीय चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे. मात्र, बीएसएफ आणि पाक रेंजर्समध्ये आधीच बैठक झालेली आहे. त्यामुळे या पत्राला काहीही अर्थ नाही, असे स्वरूप म्हणाले. याउपर संयुक्त राष्ट्राने काही पाऊल उचललेच, तर भारत योग्यरीत्या प्रतिक्रिया नोंदवेल, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले. पाकने संयुक्त राष्ट्राला दोन पत्रे सोपविल्याची आम्हाला कल्पना आहे. भारत याबाबत योग्य वेळी प्रतिक्रिया देईल, असेही ते म्हणाले. -----काय आहे आरोपसंयुक्त राष्ट्रातील पाकच्या राजदूत मलीहा लोधी यांनी सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष रशियन राजदूत विताली चुर्किन यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तानदरम्यानच्या १९७ कि. मी. लांबीच्या ताबारेषेवर १० मीटर उंच आणि १३५ फूट रुंद भिंत बांधण्याचे भारताचे मनसुबे असून पाक त्याबाबत चिंतित आहे. या क्षेत्रात कोणताही भौतिक बदल घडवून आणणारे बांधकाम हे सुरक्षा परिषदेच्या १९४८ मधील प्रस्तावाचे उल्लंघन ठरेल, असे पाक मानतो.---------- पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्र आमसभेतील त्यांच्या भाषणात काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्यास भारत त्याला प्रत्युत्तर देईल, असेही स्वरूप यांनी स्पष्ट केले. शरीफ यांनी गेल्यावर्षीही युनोच्या आमसभेत काश्मीरचा मुद्दा मांडला होता त्याला पंतप्रधान मोदी यांनी जोरदार विरोध केला होता.---------