पाकला एकाकी पाडा, निर्बंध घाला - नरेंद्र मोदी
By admin | Published: September 9, 2016 05:40 AM2016-09-09T05:40:45+5:302016-09-09T05:40:45+5:30
आमचा ‘एक शेजारी’ देश दहशतवाद निर्माण करून त्याची निर्यात करतोय, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पाकवर पुन्हा हल्ला चढवला.
व्हिएनतियान : आमचा ‘एक शेजारी’ देश दहशतवाद निर्माण करून त्याची निर्यात करतोय, अशा शब्दांत पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पाकवर पुन्हा हल्ला चढवला.
अशा चिथावणीखोर देशाला एकाकी पाडण्यात यावे आणि त्याच्यावर निर्बंध आणावेत असे आवाहनही मोदी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला केले. आमच्या शेजारी असलेल्या एका देशाचे वैशिष्ट्य म्हणजे, दहशतवाद जन्माला घालून त्याची निर्यात करणे, असे ते पाकचा थेट उल्लेख न करता म्हणाले. मोदी येथे भरलेल्या पूर्व आशिया शिखर परिषदेत बोलत होते.
ते म्हणाले, ‘दहशतवादाच्या या निर्यातीमुळे शांततेसाठीची जागा घटत असून, हिंसाचारासाठी मात्र वाढत आहे. पर्यायाने सगळ््यांचीच शांतता व समृद्धी धोक्यात आली आहे. या वेळी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग उपस्थित होते. चारच दिवसांपूर्वी मोदी यांनी ब्रिक्स देशांच्या परिषदेत सदस्य देशांना दहशतवादाविरोधात लढण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते.
ओबामा-द्युतेर्ते भेट
बराक ओबामा यांच्याबद्दल फिलिपाइन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो द्युतेर्ते यांनी आक्षेपार्ह शेरेबाजी केल्यानंतरही उभयतांची बुधवारी भोजनापूर्वी अनौपचारिक भेट झाल्याचे फिलिपाइन्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आक्षेपार्ह विधानानंतर ओबामा यांनी द्युतेर्ते यांच्याशी मंगळवारी ठरलेली नियोजित भेट रद्द केली होती.
मोदी यांनी गुरुवारी चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांची भेट घेतली. त्याआधी त्यांची हँगझोऊ येथे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी भेट झाली होती. मोदींनी लाओशियन पंतप्रधान थोंगलाऊन सिसोलिथ आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष पार्क ग्युऊन-हाये यांचीही भेट घेतली होती. बुधवारी रात्री मोदी व बराक ओबामा यांचीही भेट झाली.
मोदी आणि बराक ओबामा यांची यावेळी भेट झाली. गेल्या दोन वर्षांमध्ये झालेली या दोघांची ही आठवी भेट होती. अमेरिकेचा भारताच्या एनएसजी सदस्यत्वासाठी पाठिंबा असेल असे ते म्हणाले.