मुल्ला उमरच्या मृत्यूची माहिती पाकने लपविली
By admin | Published: August 16, 2015 10:17 PM2015-08-16T22:17:08+5:302015-08-16T22:17:08+5:30
तालिबानचा प्रमुख मुल्ला उमर याचा मृत्यू झाला याची माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला माहिती होती, असे पेंटॅगॉनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले
वॉशिंग्टन : तालिबानचा प्रमुख मुल्ला उमर याचा मृत्यू झाला याची माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला माहिती होती, असे पेंटॅगॉनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले. मुल्ला उमरच्या मृत्यूची माहिती या यंत्रणेने लपविल्यामुळे अमेरिका-पाकिस्तानमधील गुप्त सहकार्य अपयशी ठरले, असे नाही तर अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचेही अपयश त्यातून समोर आले आहे.
जवळपास २० वर्षे तालिबान संघटनेच्या प्रमुखपदी असलेल्या मुल्ला उमरचा २३ एप्रिल २०१३ रोजी कराचीतील रुग्णालयात मृत्यू झाल्याची बातमी होती; परंतु त्याच्या रहस्यमय मृत्यूसंदर्भातील बातमी याच महिन्यात बाहेर आली व त्यानंतर पाकिस्तान, अमेरिका आणि अफगाणच्या सरकारांनी त्याला दुजोरा दिला. मुल्ला उमरचा मृत्यू क्षयरोगाने झाल्याचे समजते. तालिबानच्या नेत्यांवर पाकिस्तानचा चांगला प्रभाव आहे. गेल्या महिन्यात अफगाणिस्तानात निवडून आलेल्या सरकारशी शांतता बोलण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पाकिस्तानने उमरच्या मृत्यूबाबत माहिती देण्यास नकार दिला.