पाकिस्तान - लाहोरमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोटात 20 जणांचा मृत्यू, 30 जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 06:20 PM2017-07-24T18:20:08+5:302017-07-24T18:20:08+5:30
पंजाबचे मुख्यमंत्री शाहबाज शरिफ यांच्या निवास्थानाबाहेर हा बॉम्बस्फोट झाला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि. 24 - लाहोर येथे झालेल्या भीषण आत्मघाती बॉम्बस्फोटात 20 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झाले आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री शाहबाज शरिफ यांच्या निवास्थानाबाहेर हा बॉम्बस्फोट झाला आहे. याच ठिकाणी त्याचं कार्यालयही आहे. मृतांमध्ये काही पोलीस कर्मचा-यांचाही समावेश आहे. लाहोर पोलीस प्रमुख कॅप्टन अमीन यांनी पोलिसचं हल्लेखोरांचं मुख्य टार्गेट होते असा दावा केला आहे. तसंच हा आत्मघाती बॉम्बस्फोट असल्याच्या माहितीला त्यांनी दुजोरा दिला आहे.
"पोलीस आणि लाहोर विकास प्राधिकरणाचे अधिकारी आरफा करीम टॉवरजवळील अनधिकृत बांधकाम हटवत होते. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून काही अंतरावरच हा परिसर आहे. त्याचवेळी हा भीषण बॉम्बस्फोट झाला. काही जखमींची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती अधिका-यांनी व्यक्त केली आहे. बॉम्बस्फोट झाला तेव्हा मुख्यमंत्र्यांची मॉडेल टाऊनमधील कार्यालयात बैठक सुरु होती.