20 वर्षीय तरुणीने 60 वर्षांच्या दुकानदाराशी केलं लग्न; लिपस्टिकने सुरू झाली प्यारवाली लव्हस्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 08:00 PM2022-09-28T20:00:10+5:302022-09-28T20:01:49+5:30
एका 20 वर्षीय मुलीने चक्क 60 वर्षीय व्यक्तीशी लग्न केलं आहे.
प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. प्रेमाचे अनेक भन्नाट किस्से हे सातत्याने समोर येत असतात. अशीच एक अजब प्रेमाची गजब घटना आता समोर आली आहे. एका 20 वर्षीय मुलीने चक्क 60 वर्षीय व्यक्तीशी लग्न केलं आहे. पाकिस्तानमध्ये ही घटना घडली आहे. 60 वर्षीय अशरफ अली 20 वर्षीय अंबरच्या प्रेमात पडले आहेत. प्रेम इतकं वाढलं की दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातीला मुलीच्या घरच्यांनी अशरफ यांच्या वयामुळे लग्नासाठी आक्षेप घेतला. पण असं म्हणतात की, प्रेमाचाच विजय होतो, तसंच यांच्याही लव्हस्टोरीमध्ये शेवटी प्रेमाचाच विजय झाला. सध्या यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या पाकिस्तानी जोडप्याची प्रेमकहाणी एका दुकानापासून सुरू झाली. 60 वर्षीय अशरफ अली यांचे कॉस्मेटिकचे दुकान होते जे कोरोनाच्या काळात बंद झाले होते.
अंबर अशरफ यांच्या दुकानात लिपस्टिक, पावडर, परफ्यूम, आयलायनर यासारख्या वस्तू खरेदीसाठी येत असे. व्हिडिओमध्ये अशरफ यांनी अंबर सामान घेण्यासाठी दुकानात येत होती, त्याच दरम्यान ती मला आवडली. त्यानंतर आमचे प्रेमप्रकरण सुरूच राहिले असं म्हटलं आहे. अशरफ यांच्या दुकानातून सौंदर्यप्रसाधने खरेदी करण्याचे कारण त्याच्या दुकानातील वस्तुंची गुणवत्ता चांगली होती. दुकानात भेटीदरम्यान दोघांमध्ये बोलणे सुरू झाले अन् ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
पाकिस्तानातील या जोडप्याच्या वयात तब्बल 40 वर्षांचे अंतर आहे. व्हिडिओमध्ये अशरफ यांनी या वयात लग्न का केले? याबद्दल सांगितले आहे. अशरफ हे सर्व भावंडांमध्ये सर्वात मोठे होते. त्यांनी सगळ्यांची लग्नं केली पण स्वतः लग्न करू शकले नाही. याचदरम्यान अंबर जेव्हा दुकानात आली तेव्हा ती खूप आवडली. अंबरनेच अशरफ अलीला प्रपोज केले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.