होय आमच्या देशात दहशतवादी आहेत, पाकिस्तानी लष्कराची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 08:46 PM2019-04-29T20:46:28+5:302019-04-29T20:47:44+5:30
पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवादी तळांबाबतचे पुरावे भारताकडून नेहमीच आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहमीच मांडण्यात येत असतात. मात्र या दहशतवाद्यांचे आश्रयदाते असलेले पाकिस्तानी सरकार आणि पाकिस्तानी सैन्य ही बाब नाकारत असते. मात्र...
इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवादी तळांबाबतचे पुरावे भारताकडून नेहमीच आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहमीच मांडण्यात येत असतात. मात्र या दहशतवाद्यांचे आश्रयदाते असलेले पाकिस्तानी सरकार आणि पाकिस्तानी सैन्य ही बाब नाकारत असते. मात्र पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवादी आहेत. तसेत त्यांचा बीमोड करण्यासाठी बरेच काही करण्याची गरज आहे, असे पाकिस्तानने प्रथमच कबूल केले आहे. पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी मेजर जनरल आसिफ गफूर यांनी हे वक्तव्य केले आहे.
सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आसिफ गफूर म्हणाले की, पाकिस्तानने हिंसक कट्टरवारी संघटना आणि जिहादी गटांवर बंदी आणली आहे. तसेच आम्ही त्यांच्याविरोधात कारवाई करत आहोत. दहशतवादामुळे पाकिस्तानला बरेच नुकसान सहन करावे लागले आहे. या दहशवादाचा बीमोड करण्यासाठी बरेच काही करण्याची गरज आहे.''
इंटर सव्हिसेस पब्लिक रिलेशनचे डीजी असलेले मेजर जनरल आशिफ गफूर यांनी यावेळी दहशतवादाचा खात्मा करण्यामध्ये याआधीची सरकारे अपयशी ठरली, तसेच दहशतवादामुळे पाकिस्तानचे लाखो डॉलरचे नुकसान झाले हेही मान्य केले. याआधीची सरकारे अशा दहशतवादी गटांवर मेहेरबानी करण्यात गुंतलेली होती, तसेच प्रत्येक संरक्षण यंत्रणाही यातच गुंतलेली होती. त्यामुळे आम्हाला अशा संधटनांविरोधात रणनीती बनवण्यात अपयशी ठरलो. मात्र आता अशा दहशतवाद्यांविरोधात रणनीती बनवण्यात येत आहे, असेही गफूर यांनी सांगितले.
Pakistan admits presence of terrorists in its territory
— ANI Digital (@ani_digital) April 29, 2019
Read @ANI story | https://t.co/IDdMV1w9JDpic.twitter.com/ifSCXv4Rch
काही महिन्यांपूर्वी झालेला पुलवामा हल्ला, तसेच काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया या पार्श्वभूमीवर भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी लष्कराने दिलेली ही कबुली महत्त्वाची आहे.