पाकिस्तानमध्ये मोठा विमान अपघात, पेशावरमधील रहिवासी भागात कोसळले हवाई दलाचे विमान, दोन वैमानिकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 08:59 PM2022-03-22T20:59:20+5:302022-03-22T20:59:43+5:30
Plane Crash in Pakistan: पाकिस्तानमधील पेशावरमध्ये हवाई दलाचे विमान कोसळून मोठा अपघात झाला आहे. पेशावरमधील रहिवासी भागामध्ये पाकिस्तान हवाई दलाचे एक विमान कोसळले. या विमानामध्ये स्वार असलेल्या दोन्ही वैमानिकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला.
इस्लामाबाद - पाकिस्तानमधील पेशावरमध्ये हवाई दलाचे विमान कोसळून मोठा अपघात झाला आहे. पेशावरमधील रहिवासी भागामध्ये पाकिस्तान हवाई दलाचे एक विमान कोसळले. या विमानामध्ये स्वार असलेल्या दोन्ही वैमानिकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार अपघात झालेले विमान हवाई दलाचे ट्रेनी विमान होते. पाकिस्तान हवाई दलाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार या विमानामध्ये असलेल्या दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी सांगितले की, विमानाला अपघात झाल्यानंतर मदतीसाठी ११२२ क्रमांकाची रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. दरम्यान, बचाव दल विमानाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा करत होते.
तत्पूर्वी ९ मार्च रोजी पाकिस्तानमध्ये एक मोठा अपघात झाला होता. त्यात हवाई दलाचे विमान अपघातग्रस्त झाले होते. हा अपघात पंजाब प्रांतातील मिया चन्नू नामाक ठिकाणी झाला होता. या अपघातात कुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले नव्हते. दरम्यान, पाकिस्तानमध्ये या आधीही अशा प्रकारचे अपघात झाले होते.