चीन आणि पाकिस्तान बनवतंय जगाला उद्ध्वस्त करणारा घातक व्हायरस? सीक्रेट लॅबमध्ये सुरूय रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 11:05 AM2022-11-10T11:05:32+5:302022-11-10T11:14:50+5:30

चीनमधील वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी आणि पाकिस्तानच्या संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था रावळपिंडीमध्ये घातक आजार पसरवणाऱ्या व्हायरसवर संशोधन करत आहे.

pakistan and china researching deadly virus secretly in secret facility near rawalpindi | चीन आणि पाकिस्तान बनवतंय जगाला उद्ध्वस्त करणारा घातक व्हायरस? सीक्रेट लॅबमध्ये सुरूय रिसर्च

चीन आणि पाकिस्तान बनवतंय जगाला उद्ध्वस्त करणारा घातक व्हायरस? सीक्रेट लॅबमध्ये सुरूय रिसर्च

googlenewsNext

चीन आणि पाकिस्तानमुळे संपूर्ण जगाचं टेन्शन वाढलं आहे. आणखी एका नव्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. चीन, पाकिस्तान हे दोन्ही देश जैविक शस्त्रांवर काम करत असून कोरोनापेक्षा अधिक घातक व्हायरसवर काम सुरू आहे. रावळपिंडीतील एका सीक्रेट लॅबमध्ये गेल्या काही महिन्यांपासून जैवित्र शस्त्रांवर काम सुरू असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

चीनमधील वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी आणि पाकिस्तानच्या संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था रावळपिंडीमध्ये घातक आजार पसरवणाऱ्या व्हायरसवर संशोधन करत आहे. त्यासाठी रावळपिंडीत एक सीक्रेट लॅब तयार करण्यात आली आहे. या जागेच्या आसपास चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. चीन-पाकिस्तान एकत्रितपणे कोरोनासारखा भयंकर व्हायरस तयार करण्यासाठी काम करत असल्याचं वृत्त आंतरराष्ट्रीय पातळीवरील माध्यमांनी दिलं आहे. हा व्हायरस कोरोनापेक्षा अधिक जीवघेणा असू शकतो.

संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था पाकिस्तानी लष्कराकडून चालवली जाते. पाकिस्तानच्या साथीने चीनने प्रयोगशाळेतील एक अतिशय संक्रामक नेटवर्क आऊटसोर्स केल्याची माहिती समोर येत आहे. चीन आणि पाकिस्तान कोरोनापेक्षा 100 पट अधिक धोकादायक आणि संक्रामक व्हायरस तयार करत असल्याचं समजतं. रावळपिंडीतील प्रयोगशाळेत शास्त्रज्ञ केवळ प्रयोग करत नसून ते धोकादायक व्हायरस तयार करत आहेत, अशी चिंता वाढणारी माहिती जैविक हत्यारांशी संबंधित तज्ज्ञांनी दिली.

चीनच्या मध्यभागी असलेल्या वुहान शहरात 2019 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. 2019 च्या अखेरीस कोरोनाचा वेगाने प्रसार सुरू झाला. 30 डिसेंबर 2020 रोजी भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. चीनच्या वुहान विद्यापीठात परीक्षा देऊन आलेल्या विद्यार्थिनीला कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं. तेव्हापासून देश कोरोनाच्या संकटाशी लढत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: pakistan and china researching deadly virus secretly in secret facility near rawalpindi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.