Pakistan Army Crisis : कंगाल पाकिस्तानला परेड दाखवायलाही पैसा नाही; आर्थिक संकटाचा लष्कराला फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 05:23 PM2023-03-11T17:23:00+5:302023-03-11T17:24:08+5:30
Pakistan Army Crisis : काही महिन्यांपासून पाकिस्तान आर्थिक संकटाच सापडला आहे.
Pakistan Army Crisis : गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान आर्थिक संकटाच सापडला असून तेल, पीठ, डाळींसह चिकनचे दर गगनाला भिडले आहेत. एकीकडे परकीय चलनसाठा संपत आला आहे. तर दुसरीकडे अजुनही आयएफएमने कर्ज दिलेले नाही. आता पाकिस्तानचे हे संकट लष्करापर्यंत पाहाचले आहे. लष्कराला ग्राउंडवरील परेडसाठीही पैसे मिळत नसल्याचे समोर आले आहे.
दरवर्षी २३ मार्च रोजी होणाऱ्या पाकिस्तान 'डे' परेडला पाकिस्तानी लष्कराने 'मर्यादित' करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर लष्कर हे पाऊल उचलणार आहे. १९४० च्या लाहोर ठरावाच्या स्मरणार्थ २३ मार्च रोजी पाकिस्तान दिन साजरा करतो. यावेळी पाकिस्तानी लष्कर आपली शस्त्रास्त्रे आणि सामर्थ्य दाखवते. मात्र यंदाच्या आर्थिक संकटाचा परिणाम या परेडवरही पाहायला मिळणार आहे. शाहबाज सरकारने आधीच लष्कराला आपल्या खर्चात कपात करण्यास सांगितले आहे.
चीनमध्ये लॉकडाऊनची तयारी; कोरोनानंतर आता 'या' आजाराचा हाहाकार, औषधांचा तुटवडा
आर्थिक संकटामुळे यावेळी परेड शकरपारियन परेड मैदानाऐवजी राष्ट्रपती भवनात होणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी जाहीर केलेल्या 'खर्च-कपात' मोहिमेचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. संरक्षण खर्च कमी करण्यासाठी पाकिस्तानवर सध्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून दबाव येत आहे.
पाकिस्तान पहिल्यांदाच एवढ्या वाईट आर्थिक संकटातून जात आहे. आयएमएफशी कर्जासाठी अजुनही चर्चा सुरू आहे. IMF सोबत कर्मचारी-स्तरीय करार येत्या दोन दिवसांत होऊ शकतो. इस्लामाबादमध्ये एका चर्चासत्राला संबोधित करताना अर्थमंत्री म्हणाले की, सध्याच्या सरकारला आर्थिक संकटाचा वारसा मिळाला आहे. सरकार देशाच्या आर्थिक सुधारणांसाठी पावले उचलत आहे. (Pakistan Army Crisis )
भारताप्रमाणे पाकिस्तानलाही आपल्या अर्थव्यवस्थेची पुनर्रचना करावी लागेल, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. पाकिस्तानी वृत्तपत्राच्या संपादकीयमध्ये पाकिस्तानने भारताचा आदर्श न पाळल्यास येणारे दिवस त्यांच्यासाठी अधिक कठीण होतील, असा इशारा देण्यात आला आहे.