पाकिस्तानी सैन्याची क्रूरता, बलूच आंदोलनकर्त्यांवर गोळीबार; महिला, मुलांनाही सोडलं नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 15:48 IST2025-03-22T15:47:26+5:302025-03-22T15:48:04+5:30
सैन्याकडून झालेल्या गोळीबारात ३ बलूच लोक मारले गेले, त्याशिवाय अन्य जखमी झाले. शनिवारी सकाळी ५.३० वाजता सुरक्षा जवानांनी धरणे आंदोलन करणाऱ्या बलूच लोकांवर हल्ला केला

पाकिस्तानी सैन्याची क्रूरता, बलूच आंदोलनकर्त्यांवर गोळीबार; महिला, मुलांनाही सोडलं नाही
क्वेटा - गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि बलूचिस्तान यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. बलूचिस्तानमध्ये बलूच नॅशनल मूवमेंट आणि बलूच स्टुडेंट ऑर्गेनायझेशन आझादसारख्या संघटनांच्या कार्यकर्त्यांची सुटका करा अशी मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पाकिस्तानी सैन्यानं बळाचा वापर केला आहे. पाकिस्तानी आर्मीने बलूच नॅशनल मूवमेंटचे प्रमुख कार्यकर्ता महरंग बलूच आणि इतरांना अटक केली आहे. राज्य सुरक्षा दलाकडून शनिवारी सकाळी सकाळी करण्यात आलेल्या क्रूर कारवाईत महिला आणि लहान मुलांवरही हल्ला केला गेला. आंदोलनस्थळी काही मृतदेहही आढळले.
बलूच यकजेहती कमिटीने त्यांच्या सेंट्रल कमिटीतील सदस्य बेबर्ग, त्याचा भाऊ हम्माल, डॉ. इलियास, बलूच महिला सईदा आणि अन्य लोकांच्या सुटकेची मागणी केली. यासाठी क्वेटा इथं आंदोलन करण्याची घोषणा झाली. महरंग बलूच यांनी त्यांच्या एक्सवर व्हिडिओ मेसेज करत पाकिस्तानवर आरोप केला आहे. क्वेटा येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या बलूच कार्यकर्त्यांवर पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केला. सुरूवातीपासून पाकिस्तान सरकार आमच्या आंदोलनावर हिंसक उत्तर देत असल्याचा आरोप त्यांनी केला.
पाक सैन्यानं केला गोळीबार
राज्य सुरक्षा दलाने बलूच आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला. अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या. सामुहिक अटकेनंतर आणखी तीव्र कारवाई केली. नेटवर्क बंद केले. आंदोलनकर्त्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलाने सरयाबमध्ये शोध मोहिम सुरू केली. सैन्याकडून झालेल्या गोळीबारात ३ बलूच लोक मारले गेले, त्याशिवाय अन्य जखमी झाले. शनिवारी सकाळी ५.३० वाजता सुरक्षा जवानांनी धरणे आंदोलन करणाऱ्या बलूच लोकांवर हल्ला केला. त्यांच्यासोबत क्रूरता केली असं महरंग बलूच यांनी सांगितले.
पाकिस्तानी सैन्याने बलूच महिला, मुले आणि शांततापूर्वक आंदोलन करणाऱ्यांवर हिंसेचा वापर केला. सुरक्षा दलाने बळजबरीने त्यांचे मृतदेह जप्त केले. ज्या आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या मृतदेहांवर नमाज पठण करण्याची योजना बनवली होती. त्यांनाही फरफटत बख्तरबंद गाड्यांमध्ये घेऊन गेले. बलूचिस्तानमध्ये बलूच नॅशनल मूवमेंट आणि बलूच स्टुंडेट ऑर्गेनायझेशन आझादसारख्या संघटनांच्या कार्यकर्त्यांना टार्गेट करण्यात आले. काहींना गायब केले. टार्गेट किलिंग करण्यात आली. भय दाखवत, धमकावत संघटनांना गप्प करण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप होत आहे.