नियंत्रण रेषेजवळ भारताचे विमान पाडल्याचा पाकिस्तानचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2018 11:32 AM2018-03-07T11:32:16+5:302018-03-07T11:32:16+5:30
पाकिस्तानी लष्कराने भारताचे ड्रोन विमान पाडल्याचा दावा केला आहे. नियंत्रण रेषेजवळ हवाई हद्दीचे उल्लंघन केल्यामुळे तात्काळ कारवाई करुन हे ड्रोन विमान पाडण्यात आले.
नवी दिल्ली - पाकिस्तानी लष्कराने भारताचे हेरगिरी करणारे ड्रोन विमान पाडल्याचा दावा केला आहे. नियंत्रण रेषेजवळ हवाई हद्दीचे उल्लंघन केल्यामुळे तात्काळ कारवाई करुन हे ड्रोन विमान पाडण्यात आले असे पाकिस्तानी सैन्याने म्हटले आहे. भारताचे ड्रोन विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसून हेरगिरी करत होते.
त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरमधील चिरीकोट गावाजवळ हे विमान पाडण्यात आले. पाकिस्तानी सैन्याने या विमानाचे अवशेष ताब्यात घेतले आहेत असे पाकिस्तानी सैन्याने म्हटले आहे. मागच्या वर्षभरात भारताचे चौथे ड्रोन विमान पाडण्यात आल्याचे पाकिस्तानी सैन्याने म्हटले आहे. भारताने यावर लगेचच कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.