अविश्वास प्रस्तावादरम्यान PTI सरकारची खेळी; PMO च्या यूट्यूब चॅनेलचे बदलले नाव, ठेवले 'इम्रान खान' 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 02:53 PM2022-03-26T14:53:12+5:302022-03-26T14:54:52+5:30

Imran Khan : पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीच्या एका दिवसानंतर नावात बदल करण्यात आला आहे.

pakistan as pti govt facing no confidence motion pak pmo youtube channel renamed imran khan | अविश्वास प्रस्तावादरम्यान PTI सरकारची खेळी; PMO च्या यूट्यूब चॅनेलचे बदलले नाव, ठेवले 'इम्रान खान' 

अविश्वास प्रस्तावादरम्यान PTI सरकारची खेळी; PMO च्या यूट्यूब चॅनेलचे बदलले नाव, ठेवले 'इम्रान खान' 

Next

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना सध्या अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने (PMO) आपल्या यूट्यूब चॅनलचे नाव बदलून 'इम्रान खान' केले आहे. नाव बदलण्यावरून इंटरनेट युजर्स आता इम्रान सरकारवर निशाणा साधत आहेत.

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीच्या एका दिवसानंतर नावात बदल करण्यात आला आहे. शुक्रवारी इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात अविश्वास प्रस्तावासाठी बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, शुक्रवारी ठराव न आणता नॅशनल असेंब्लीचे कामकाज 28 मार्चपर्यंत तहकूब करण्यात आले. पाकिस्तानी मीडिया आउटलेट जिओ टीव्हीच्या वृत्तानुसार, 'इम्रान खान' नावाच्या चॅनलचे यूट्यूबने टिकसह सत्यापन केले नाही. या चॅनेलचे सध्या 150,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधानांची भाषणे आणि उपक्रम या चॅनलवर अपलोड केले जातात. दरम्यान, 2019 मध्ये इम्रान खान यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर एक वर्षानंतर ते बनवण्यात आले. 

पीएमओच्या यूट्यूब चॅनेलचे नाव बदलण्याबाबत पाकिस्तान सरकारच्या डिजिटल मीडिया विंगचे महाव्यवस्थापक इम्रान गजाली यांनी सांगितले की, त्यांची शाखा केवळ पंतप्रधान कार्यालयातील ट्विटर आणि फेसबुक खाती व्यवस्थापित करते. ते म्हणाले की, यूट्यूब चॅनल आमच्या विभागांतर्गत येत नाही. दुसरीकडे, पंतप्रधान कार्यालयाच्या यूट्यूब चॅनेलचे नाव बदलल्याबद्दल इंटरनेट युजर्स प्रतिक्रिया देत आहेत. आज चॅनलवर अपलोड केलेल्या इम्रान खान यांच्या मनसेरा रॅलीच्या व्हिडिओवर, एका युजर्सने म्हटले की, त्यांनी चॅनलचे नावावरून 'पंतप्रधान' असे का हटविले आहे. 

दरम्यान, इस्लामाबादमध्ये विरोधी पक्ष पीपीपीच्या लाँग मार्चनंतर 8 मार्च रोजी अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला होता. तर सत्ताधारी पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे अनेक असंतुष्ट सदस्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. सरकारच्या मित्रपक्षांनी विरोधकांसोबत जाण्याची भूमिका घेतली आहे. 

Web Title: pakistan as pti govt facing no confidence motion pak pmo youtube channel renamed imran khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.