पाकनेच केला मुंबईवर हल्ला
By admin | Published: August 5, 2015 02:26 AM2015-08-05T02:26:25+5:302015-08-05T02:26:25+5:30
दहशतवादाबद्दल नेहमीच दुटप्पी भूमिका घेणाऱ्या, तसेच मुंबईतील २६-११च्या हल्ल्याशी आपला काहीच संबंध नाही असा कांगावा करणाऱ्या पाकिस्तानला
इस्लामाबाद : दहशतवादाबद्दल नेहमीच दुटप्पी भूमिका घेणाऱ्या, तसेच मुंबईतील २६-११च्या हल्ल्याशी आपला काहीच संबंध नाही असा कांगावा करणाऱ्या पाकिस्तानला त्यांच्याच एका माजी तपास अधिकाऱ्याने सणसणीत चपराक लगावली आहे. २६-११च्या मुंबई हल्ल्याचा कट पाकिस्तानातच शिजला असून, त्याची अंमलबजावणीही पाकिस्तानी भूमीवरूनच झाली आहे, या हल्ल्याशी लष्कर-ए-तोयबाचा संबंध असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाले असून, पाक सरकारने याची कबुली द्यावी, सत्य स्वीकारावे व आपल्या भूमीतून दहशतवाद्यांचा खात्मा करावा, असे पाकिस्तानला ठणकावून सांगण्याचे काम पाकच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे (एफआयए) माजी प्रमुख तारिक खोसा यांनी केले आहे.
खोसा हे पाकिस्तानात प्रामाणिक अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. पाकिस्तानातील बेनझीर भुत्तो हत्या प्रकरण, मेमोगेट ही महत्त्वाची प्रकरणे त्यांनीच हाताळली असून, त्यानंतर २६-११च्या मुंबई हल्ल्याच्या तपासाची जबाबदारीही पाक सरकारने त्यांच्यावर
पुढे काय?
खोसा यांच्या जिवाला पाकिस्तानात धोका. पण, या खुलाशानंतर त्यांच्या जिवाचे बरे-वाईट होणे पाकला न परवडणारे.
भारतात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया पाक पुरस्कृत असल्याचा दावा भारताला आणखी जोरात करणे शक्य होणार आहे.
खोसा यांनी उघड केलेल्या माहितीनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची कुचंबणा होऊ शकते.
दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी कटिबद्ध असल्याची भाषा वापरणाऱ्या पाकिस्तानवर कृतीसाठीचा दबाव वाढणार
पाकिस्तानला
२६/११च्या खटल्याच्या निकालावर आरोपींना अनुकूल ठरणारा प्रभाव टाकणे जड जाईल.
(पान ९ वर)