हाफिझ सईदच्या दहशतवादी संघटनांवर पाकिस्तानने घातली बंदी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 10:20 PM2019-03-05T22:20:19+5:302019-03-05T22:20:49+5:30

मसूद अझहरच्या जैश ए मोहम्मद संघटनेशी संबंधित दहशतवाद्यांची धरपकड केल्यानंतर आता पाकिस्तान सरकारने हाफिझ सईदच्या दहशतवादी संघटनांवरही कारवाई केली आहे.

Pakistan ban on Hafiz Saeed's terrorist organizations | हाफिझ सईदच्या दहशतवादी संघटनांवर पाकिस्तानने घातली बंदी 

हाफिझ सईदच्या दहशतवादी संघटनांवर पाकिस्तानने घातली बंदी 

Next

इस्लामाबाद - मसूद अझहरच्या जैश ए मोहम्मद संघटनेशी संबंधित दहशतवाद्यांची धरपकड केल्यानंतर आता पाकिस्तान सरकारने हाफिझ सईदच्या दहशतवादी संघटनांवरही कारवाई केली आहे. हाफिझ सईदची दहशतवादी संघटना जमात उल दावा आणि या संघटनेची सहसंस्था असलेल्या फालाह ए इंसानियत फाऊंडेशन या संस्थांवर पाकिस्तान सरकारने दहशतवाद विरोधी कायदा 1997 अंतर्गत बंदी घालण्यात आली आहे. 

 पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधून चालणाऱ्या दहशतवादी संघटनांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच भारताने कुटनीतिक दबाव आणून जागतिक पातळीवर पाकिस्तानची कोंडी केली आहे. त्यामुळे अखेर आंतरराष्ट्रीय दबावासमोर झुकून पाकिस्तानला आपल्या देशातील दहशतवादी संघटनांवर करावाई करावी लागत आहे.  त्याचाच भाग म्हणून आज . हाफिझ सईदची दहशतवादी संघटना जमात उल दावा आणि या संघटनेची सहसंस्था असलेल्या फालाह ए इंसानियत फाऊंडेशन या संस्थांवर कारवाई करण्यात आली आहे.





दरम्यान, पाकिस्तान सरकारने मसूद अझहरच्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेवर कारवाई करताना मसूदच्या दोन भावांसह एकूण 44 दहशतवाद्यांना अटक केली होती. मुफ्ती अब्दुल रौफ आणि हम्माद अझहर या मसूद अझहरच्या भावांसह एकूण 44 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र ही कारवाई कुणाच्याही दबावाखाली येऊन करण्यात आलेली नाही, असा दावा पाकिस्तानचे मंत्री शहरयार आफ्रिदी यांनी केला होता. 



 

Web Title: Pakistan ban on Hafiz Saeed's terrorist organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.