पाकिस्तान, बांगलादेश आणि चीनला हादरे

By admin | Published: April 26, 2015 02:15 AM2015-04-26T02:15:11+5:302015-04-26T02:15:11+5:30

नेपाळमधील विध्वसंक भूकपांने भारतासह शेजारील पाकिस्तान, बांगलादेश आणि चीनही हादरले. बांगलादेशात दोन महिलेसह तीन जण ठार, तर अनेक जण जखमी झाले

Pakistan, Bangladesh and China, | पाकिस्तान, बांगलादेश आणि चीनला हादरे

पाकिस्तान, बांगलादेश आणि चीनला हादरे

Next

ढाका/इस्लामाबाद/बीजिंग : नेपाळमधील विध्वसंक भूकपांने भारतासह शेजारील पाकिस्तान, बांगलादेश आणि चीनही हादरले. बांगलादेशात दोन महिलेसह तीन जण ठार, तर अनेक जण जखमी झाले असून चीनच्या नैर्ऋत्येकडील स्वायत्त तिबेटमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला. या शक्तिशाली भूकंपाचे धक्के बांगलादेशात सर्वत्र जाणवले. व्यायव्य पबाना येथील एका शाळेत बैठक चालू असताना शाळेची इमारत थरारली. रोकया खानम यांना भूकंप झाल्याची जाणीव होताच बैठक सोडून बाहेर पडण्याच्या धावपळीत असताना त्या भिंतीला धडकल्या, असे खाजगी टीव्ही चॅनल आणि एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
चीनमध्ये १२ ठार; अनेक घरांचे नुकसान
चीनच्या नैर्ऋत्येकडील तिबेटलाही भूकंपाचा तडाखा बसला. या ठिकाणी एका ८३ वर्षीय महिलेसह १२ जण ठार, तर अनेक जखमी झाले आहेत. ल्हासा आणि शिगास्ते हा परिसरातही धक्के जाणवले. न्येलाम प्रांतातील अनेक घरांचे नुकसान झाले असून, चीन-नेपाळ सीमेवरील दूरसंचार सेवाही ठप्प झाली आहे. दरम्यान, पाकिस्तानने नेपाळ आणि भारताला मदत देऊ केली आहे. पाकिस्तान सरकारने यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Pakistan, Bangladesh and China,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.