पाकिस्तानात बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना फेसबुकवर सक्रिय
By admin | Published: May 30, 2017 05:49 PM2017-05-30T17:49:29+5:302017-05-30T18:59:14+5:30
पाकिस्तानी तालिबान, लष्कर-ए-झांगवी यासारख्या अनेक दहशतवादी संघटनावर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 30 - पाकिस्तानी तालिबान, लष्कर-ए-झांगवी यासारख्या अनेक दहशतवादी संघटनावर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे. अशा बंदी घालण्यात आलेल्या 64 पैकी जवळपास 41 संघटना फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर कार्यरत असल्याचे एका माहितीद्वारे उघड झाले आहे.
सोशल मिडियाच्या प्लॅटफॉर्मवर पाकिस्तानमधील जवळपास 25 दशलक्ष युजर्स आहेत. फेसबुकवर ज्या दहशतवादी संघटना कार्यरत आहेत, त्यामध्ये येथील सुन्नी आणि शिया क्षेत्रांतील समूह, तसेच जागतिक दहशतवादी संघटनांचा समावेश आहे. सोशल मिडियात या दहशतवादी संघटनाचा शोध घेणे सोपे आहे. येथील डॉन या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित संघटनांचे शॉर्ट फॉर्म आणि त्यांच्या नावांची स्पेलिंग टाकून पाहिले असता सर्व संघटना कार्यरत असल्याचे दिसून आले. तसेच, या संघटनांच्या फेसबुक अकाऊंटवरील पेजला ब-याचं युजर्सनी लाईक केले आहे.
पाकिस्तानात बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांपैकी 64 पैकी जवळपास 41 संघटना फेसबुक कार्यरत आहेत. यामध्ये मोठी दहशतवादी संघटना अहले सुन्नत वल जमात (ASWJ) आहे. या संघटनेची फेसबुकर 200 पेजेस आणि ग्रुप्स आहेत. तर, लष्कर-ए-झांगवी (LeJ), तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP), तहरीक-ए-तालिबान स्वात आणि जमात-उल-अहरार यांसारख्या दहशतवादी संघटना खुलेआम आपला प्रचार करत आहेत.
भारताविरोधात दहशवादी कारवाया करण्याचे काम या सर्व दहशतवादी संघटना करत आहेत. काश्मीरचा मुद्दा समोर ठेऊन खुलेआम या दहशतवादी संघटना आग ओकत आहेत. फेसबुकवर युजर्संना आपल्या ग्रुप्समध्ये सामील करुन घेण्यासाठी आणि हिंसेला प्रोत्साहन देणारी ग्राफिक्स शेअर करत आहेत. तसेच, लोकांना भडकविण्यासाठी व्हिडिओ आणि ग्राफिक्स शेअर करत असल्याचे दिसून आले आहे. याचबरोबर अनेक दहशतवादी संघटना फेसबुक सोबतच ग्रुप्स वेबसाइट्स, ब्लॉग आणि ट्विटर या सोशल नेटवर्किंगमध्ये सक्रिय आहेत.