पाकिस्तानमध्ये फेसबूकवर येणार बंदी?
By admin | Published: March 22, 2017 10:37 PM2017-03-22T22:37:17+5:302017-03-22T22:37:17+5:30
सहज वापरता येत असल्याने फेसबूक जगभरात पोहोचले आहे. पण धार्मिक कट्टरतेच्या विळख्यात अडकलेल्या पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात
Next
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 22 - सहज वापरता येत असल्याने फेसबूक जगभरात पोहोचले आहे. पण धार्मिक कट्टरतेच्या विळख्यात अडकलेल्या पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात येण्याची शक्यता आहे. फेसबुकवर ईशनिंदे संदर्भात असलेल्या मजकुरामुळे फेसबुकवर बंदी घालण्यात येऊ शकते. याबाबत इस्लामाबाद हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश शौकत अझीझ सिद्दीकी यांनी सांगितले की न्यायलय यासंदर्भातील आपला निर्णय 27 मार्चला सुनावणार आहे.
न्यायालयाने फेसबूकवर करावयाच्या कारवाई संदर्भात टेलिकम्युनिकेश अॅथॉरिटीली याबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. पाकिस्तानच्या फेडरल इन्वेस्टिगेशन एजंसीच्या डीजींनी न्यायालयात सांगितले की त्यांनी यासंदर्भातील आपली चौकशी पूर्ण केली आहे आणि दोन दिवसांपूर्वी यासंदर्भात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. तसेच ईशनिंदेसंदर्भातीत मजकूर शेअर करणाऱ्या व्यक्तीला अटकही करण्यात आली आहे.
एफआयएसने याबाबत फेसबूकशी चर्चा केली आहे. आता फेसबुकचे प्रतिनिधीमंडळ याबाबत तोडगा काढण्यासाठी पाकिस्तानात येणार आहे. न्यायमूर्ती सिद्धिकी यांनीही बंदी घालण्यापूर्वी फेसबूकला एक संधी देण्यात यावी, असे मत नोंदवले आहे. त्याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी अशाप्रकारचा मजकूर हटवण्यात यावा किंवा ब्लॉक करण्यात यावा असे सांगितले होते. तसेच असा मजकूर टाकणाऱ्यांना कठोर शिक्षाही मिळाली पाहिजे असेही ते म्हणाले.
Pak court considers banning Facebook over 'blasphemous content'
— ANI Digital (@ani_digital) March 22, 2017
Read @ANI_news storyhttps://t.co/np4RQHQJi2pic.twitter.com/VXZ4QsdPD1