काबूल विमानतळ बाॅम्बस्फाेटामागे पाकिस्तान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 06:14 AM2021-08-28T06:14:29+5:302021-08-28T06:14:51+5:30
अमेरिका-आयसिस संघर्ष पेटणार? खाेरासान गटाचा म्हाेरक्या आहे पाकिस्तानी, तुरुंगातून सुटताच हल्ला लष्कर-ए-ताेयबाशी संबंध हाेता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : काबुल विमानतळाबाहेर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याचे पाकिस्तान कनेक्शन समाेर आले आहे. आयसिसच्या खाेरासान गटाचा म्हाेरक्या माैलवी अब्दुल्ला उर्फ असलम फारुकी याच्या आदेशावरुन हा हल्ला झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. फारुकी याचा पाकिस्तनातील तहरिक-ए-तालिबान या संघटनेशी संबंध असल्याचे उघड झाले आहे.
मूळचा पाकिस्तानी नागरिक असलेला फारुकी हा खाेरासान गटाचा प्रमुख आहे. त्याचे लष्कर-ए-ताेयबाशी संबंध हाेता. हक्कानी नेटवर्कच्या साथीने त्याने काबुल व जलालाबादमध्ये अनेक हल्ले घडवून आणले आहे. फारुकील अफगाणिस्तानात अटक करण्यात आली हाेती. तालिबानने देशाचा ताबा घेतल्यानंतर त्याची तुरुंगातून सुटका केली. मात्र, त्यानेच भीषण आत्मघातकी हल्ले घडवून आणले आहेत. याच फारुकीने गेल्या वर्षी
एप्रिलमध्ये काबुलमधील गुरुद्वारावर हल्ल्याचा कट रचला हाेता. त्यात २५ जणांचा मृत्यू झाला हाेता. भारतीय राजदूत या हल्ल्यांमध्ये निशाण्यावर हाेते. पाकिस्तानने यापूर्वी अनेकदा फारुकीला वाचविण्याचा प्रयत्न केला आहे.
पुन्हा संघर्ष पेटणार ?
आयसिस आणि तालिबान या दाेन्ही संघटना एकमेकांच्या कट्टर शत्रू आहेत. आयसिसने अफगाण नागरिकांसह अमेरिकेला लक्ष्य केल्यामुळे जाे बायडेन संतप्त झाले आहेत. या हल्ल्याचा हिशेब चुकता करु, असा इशारा बायडेन यांनी दिल्यामुळे अमेरिका आणि आयसिस असा संघर्ष पेटणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
९/११ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानात धडक मारुन तालिबानची राजवट संपिवली हाेती. तसेच अल कायदाचा म्हाेरक्या ओसामा बिन लादेनचाही खात्मा केला हाेता.
प्लास्टिकच्या पिशव्यांप्रमाणे उडत हाेते मानवी अवयव
हजाराे अफगाण नागरिक अफगाणिस्तानबाहेर पडण्याच्या आशेने गेटजवळ सकाळपासून उभे हाेते. मात्र, बाॅम्बस्फाेट झाल्यानंतर तेथे मानवी अवयव आणि रक्ताचा चिखल झाला. प्लॅस्टिकच्या पिशवीप्रमाणे मृतदेह, लहान मुले आणि मानवी अवयव हवेत उडताना पाहिल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.