पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट, 100 जणांचा मृत्यू
By admin | Published: February 16, 2017 08:53 PM2017-02-16T20:53:23+5:302017-02-17T00:18:11+5:30
पाकिस्तानमधील सेहवान येथील लाल शाहबाज कलंदर दर्गाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात १०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 16 - पाकिस्तानमधील सेहवान येथील लाल शाहबाज कलंदर दर्गाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात १०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली आहे. सायंकाळी सेहवान मशिदीमध्ये धमाल या सुफी कार्यक्रमासाठी भाविक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी हल्लेखोर गोल्डन गेटने दर्ग्यात शिरला आणि त्याने बॉम्बस्फोटाने स्वत:ला उडवून दिले. या हल्ल्यात स्त्रियांसह लहान मुलांचा समावेश आधिक असल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर आले आहे. स्फोट झाल्यानंतर घटनास्थळी तात्काळ पोलीस दाखल झाले.
सेहवान मशिदीमध्ये दर्ग्यात महिलांसाठी आरक्षित असलेल्या भागात आत्मघाती हल्ला करण्यात आल्याने हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. स्फोटातील जखमींना मेडिकल संकुल जमशोरा आणि उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळापासून रुग्णालय दूर असल्याने जखमींना वेळेत उपचार पुरवणे कठीण होते आहे. सुफी दर्ग्यापासून रुग्णालय जवळपास 50 किलोमीटर अंतरावर आहे. गेल्या आठवड्याभरातील पाकिस्तानमधील हा पाचवा दहशतवादी हल्ला आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी तारिक विलायत यांनी दिली आहे.