पाकिस्तानात हॉस्पिटलमध्ये बॉम्बस्फोट, ५५ ठार
By admin | Published: August 8, 2016 11:01 AM2016-08-08T11:01:31+5:302016-08-08T15:20:55+5:30
पाकिस्तानच्या क्वेटामधील रुग्णालय सोमवारी सकाळी शक्तीशाली बॉम्बस्फोटाने हादरले, या घटनेत ५५ जण ठार झाले आहेत
Next
>
ऑनलाइन लोकमत -
इस्लामाबाद, दि. ८ - पाकिस्तानच्या क्वेटामधील रुग्णालय सोमवारी सकाळी शक्तीशाली बॉम्बस्फोटाने हादरले. या घटनेत ५५ जण ठार झाले असून, १०० पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. शहरातील प्रख्यात वकील बिलाल अन्वर कासी यांची सोमवारी सकाळी गोळया झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या मृतदेहाशेजारी अन्य वकिल, पत्रकार जमले असताना रुग्णालयात बॉम्बस्फोट झाला असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
कासी यांच्या मृतदेहासोबत जवळपास ५० जण रुग्णालयाच्या आपातकालीन विभागात होते. त्यावेळी बॉम्बस्फोट झाला असे प्रत्यक्षदर्शी पत्रकाराने सांगितले.
क्वेटा येथील कोर्टाच्या दिशेने जात असताना कासी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली असे जिओ वृत्त वाहिनीने सांगितले. क्वेटामध्ये अशा प्रकारे हत्या आता सामान्य बाब बनली आहे.