Pakistan Economic Crisis: पाकिस्तान-चीनची मैत्री तुटणार? पाकच्या 'या' कारवाईमुळे ड्रॅगन भडकला, उचलणार मोठं पाऊलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 11:47 AM2023-04-19T11:47:42+5:302023-04-19T11:48:56+5:30

Pakistan Economic Crisis: चीन आणि पाकिस्तानची मैत्री सर्व जगाला माहित आहे.

pakistan business face closure in pakistan claims | Pakistan Economic Crisis: पाकिस्तान-चीनची मैत्री तुटणार? पाकच्या 'या' कारवाईमुळे ड्रॅगन भडकला, उचलणार मोठं पाऊलं

Pakistan Economic Crisis: पाकिस्तान-चीनची मैत्री तुटणार? पाकच्या 'या' कारवाईमुळे ड्रॅगन भडकला, उचलणार मोठं पाऊलं

googlenewsNext

चीन आणि पाकिस्तान गेल्या अनेक वर्षापासूनचे मित्र देश आहेत. या दोन्ही देशांची मैत्री संपूर्ण जगाने पाहिली आहे, चीनने अनेकवेळा पाकिस्तानला मदतीचा हात दिला आहे. पण, आता पाकिस्तानच्या एका चुकीमुळे या दोन्ही देशातील मैत्री तुटणार आहे.कराची पोलिसांनी चीनच्या नागरिकांचे व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसापून पाकिस्तानमध्ये चीनच्या नागरिकांवर हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यामुळे आता कराची पोलिसांनी चीनी नागरिकांचे व्यवसाय बेद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Pakistan Economic Crisis: कर्जासाठी दारोदार फिरणाऱ्या पाकिस्तानची स्थिती आणखी बिकट होणार, आता संयुक्त राष्ट्रानंही दिला इशारा

पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसापून चीनच्या नागरिकांवर कराचीमध्ये हल्ले वाढले आहेत. यामुळे कराची पोलिसांनी पाकिस्तानचे व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनी नागरिकांच्या व्यवसायाची मोठ्या प्रमाणात तोडफोड सुरू होती. गेल्या काही दिवसापासून सुरक्षेचा इशारा देऊनही चीनी व्यवसायिकांनी सुरेक्षेच्या प्रोटोकॉल लागू करण्यास अयशस्वी ठरले आहेत. यामुळे त्यांचे व्यवसाय सील करण्यात आले आहेत. 

चायनीज रेस्टॉरंट, सुपरमार्केट आणि सागरी उत्पादनांच्या कंपनीसह अनेक व्यवसाय स्थानिक पोलrस अधिकाऱ्यांनी 'सिंध सिक्युरिटी ऑफ व्हलनरेबल एस्टॅब्लिशमेंट्स अॅक्ट' मध्ये दिलेल्या मानक सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन न केल्यामुळे बंद केले आहेत. कराचीतील चिनी व्यवसायांना पुरेसे संरक्षण देण्यात अपयशी ठरल्याबद्दल स्थानिक आणि केंद्र सरकार दोघांसाठी ही लाजिरवाणी घटना आहे. कराची ही पाकिस्तानची व्यापारी राजधानी आहे.  

पाकिस्तानचे हे पाऊल त्यांचा मित्र चीनला चिथावू शकतो. पाकिस्तानचे चीनशी सामरिक संबंध आहेत. पाकिस्तानमधील चिनी दूतावासाने सांगितले की, त्यांनी पाकिस्तानमधील "खराब होत चाललेल्या सुरक्षा परिस्थितीमुळे" चिनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे, काही दिवसांनंतर, चीनने इस्लामाबादमधील आपल्या दूतावासाचा कॉन्सुलर विभाग "तात्पुरता" बंद केला.

पाकिस्तानची स्थिती आणखी बिकट 

 पाकिस्तान सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. अनेकांकडे मदतीची विनवणी करूनही चीन सोडून कोणताही देश त्यांना मदत करण्यास तयार नाही. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदतीची अपेक्षा असलेल्या पाकिस्तानला कोणतीही मदत मिळालेली नाही. अशातच आता संयुक्त राष्ट्राकडून पाकिस्तानची चिंता दुपटीनं वाढवणारं विधान करण्यात आलंय. आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानवर कर्जामुळे परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. यूएनशी संलग्न ट्रेड अँड कॉन्फरन्सकडून एक रिपोर्ट जारी करण्यात आला आहे. पाकिस्तानचे बाह्य कर्ज सातत्यानं वाढत असल्याचं या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे निर्यातीतून मिळणाऱ्या उत्पन्नात घट होईल आणि त्याच वेळी आर्थिक संकट आणखी वाढेल, असं त्यात नमूद करण्यात आलंय. पाकिस्तानवर सध्या अतिशय मोठं कर्ज आहे. जानेवारी २०२३ मध्ये कर्जामध्ये सुमारे ७.७ टक्क्यांची वाढ झाली होती.

पाकिस्तान सध्या मोठ्या संकटाच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं संयुक्त राष्ट्राकडून सांगण्यात आले आहे. २०१५ ते २०२० या कालावधीत देशावरील बाह्य कर्ज जवळपास दुप्पट झालं आहे. या कर्जामुळे २०२२ मध्ये आर्थिक संकट अधिक गडद झालं आहे. ९ मार्च रोजी स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या अहवालात म्हटलंय की जानेवारी २०२२ मध्ये देशावर ४२.४९ ट्रिलियन रुपयांचं कर्ज होतं आणि त्यात ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Web Title: pakistan business face closure in pakistan claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.