पाकिस्तानात हाहा:कार! एका रात्रीत पेट्रोल २६, डिझेल १७ रूपयांनी महागले, नवे दर झोप उडवेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 12:51 PM2023-09-17T12:51:12+5:302023-09-17T12:51:36+5:30

सरकारने डीलर्सना मार्जिन वाढवण्यास दिली मंजुरी, गगनाला भिडले भाव

Pakistan caretaker government smashed people with another hike in fuel prices Petrol Diesel rates record high prompts furore | पाकिस्तानात हाहा:कार! एका रात्रीत पेट्रोल २६, डिझेल १७ रूपयांनी महागले, नवे दर झोप उडवेल!

पाकिस्तानात हाहा:कार! एका रात्रीत पेट्रोल २६, डिझेल १७ रूपयांनी महागले, नवे दर झोप उडवेल!

googlenewsNext

Pakistan Crisis Petrol Diesel Prices : भारताला कायम पाण्यात पाहणारा शेजारील देश पाकिस्तानची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पाकिस्तानला महागाईचा फटका दिवसेंदिवस अधिकच तीव्रपणे बसताना दिसतोय. पाकिस्तानात अचानक पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. जनतेला दिलासा देण्याचे मोठमोठे दावे करणाऱ्या पाकिस्तान सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ केली आहे. पाकिस्तानमध्ये एका रात्रीत पेट्रोलचा दर 26.02 रुपयांनी वाढून 331.38 रुपये प्रति लिटर केला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानमध्ये डिझेलचे दरही वाढले आहेत. डिझेलच्या दरात 17.34 रुपयांची वाढ झाली आहे. त्याची नवीन किंमत 329.18 रुपये प्रति लिटर असेल.

गेल्या आठवड्यात, आर्थिक समन्वय समितीने (ECC) पेट्रोलियम डीलर्स आणि तेल विपणन कंपन्यांचे (OMCs) मार्जिन वाढवण्यास मंजुरी दिली होती. काळजीवाहू सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री मार्जिनमध्ये प्रति लिटर 3.5 रुपयांनी वाढ करण्यास मान्यता दिली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला कार्यवाहक अर्थमंत्री शमशाद अख्तर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ECC सत्रात हा निर्णय घेण्यात आला. समितीने ओएमसी आणि डीलर्ससाठी पेट्रोल आणि डिझेल विक्री मार्जिनमध्ये वाढ करण्यास मान्यता दिली आहे. वास्तविक, जागतिक स्तरावर वस्तूंच्या किमती सतत वाढत असल्याने सरकार पेट्रोलियमच्या किमती वाढवण्याचा विचार करत असल्याचे वृत्त यापूर्वी आले होते.

१ सप्टेंबरलाही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झाली होती वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने पाकिस्तानी नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. या महिन्यात 1 सप्टेंबर रोजी काळजीवाहू सरकारने पेट्रोलच्या दरात 14.9 रुपयांची वाढ केली होती. या वाढीसह, पेट्रोलचा दर 305.36 रुपये प्रति लिटर, तर हाय-स्पीड डिझेलचा दर 18.44 रुपयांनी वाढून 311.84 रुपयांवर पोहोचला होता.

पाकिस्तानला महागाईचा फटका

राजकीय उलथापालथीमुळे महागाईने पाकिस्तानला ग्रासले आहे. महागाईचा दर कमी झाला असला तरी परिस्थितीत सुधारणा झालेली नसून जुलै महिन्यात 28.3 टक्के दराची नोंद झाली आहे. गेल्या महिन्यात जूनमध्ये तो 29.4 टक्के होता. मे महिन्यात महागाईचा दर विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. या महिन्यात 38 टक्के महागाई दर नोंदवला गेला होता. पाकिस्तानी चलनात सातत्याने घसरण होत आहे. नवीन काळजीवाहू सरकारने पदभार स्वीकारल्यापासून पाकिस्तानी रुपया 15 रुपयांनी घसरला आहे.

Web Title: Pakistan caretaker government smashed people with another hike in fuel prices Petrol Diesel rates record high prompts furore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.