भारताच्या मदतीसाठी पाच देश एकवटले; चीन-पाकिस्तान तोंडावर आपटले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 10:14 AM2020-09-03T10:14:56+5:302020-09-03T10:19:33+5:30

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत चीन-पाकिस्तान जोरदार धक्का

pakistan China Nefarious Move Against India In Unsc Fail To Designate Two Indians As Terrorists | भारताच्या मदतीसाठी पाच देश एकवटले; चीन-पाकिस्तान तोंडावर आपटले

भारताच्या मदतीसाठी पाच देश एकवटले; चीन-पाकिस्तान तोंडावर आपटले

googlenewsNext

संयुक्‍त राष्‍ट्र: चीनच्या मदतीनं संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसला आहे. पाकिस्तान आणि चीनची नापाक खेळी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि बेल्जियमनं उधळून लावली आहे. भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्याचा मुद्दा या पाच देशांनी उपस्थित केला. 

चीनची घुसखोरी उधळण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज, पेंगाँग सरोवर, अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर क्षेपणास्त्रेही तैनात

पाकिस्ताननं याआधीही चीनच्या मदतीनं भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्याचा प्रयत्न केला आहे. अंगरा अप्पाजी आणि गोबिंदा पटनायक या भारतीय नागरिकांना दहशतवादी घोषित करण्यात यावं, यासाठी पाकिस्तानचे चीनच्या मदतीनं प्रयत्न सुरू होते. मात्र या दोघांविरोधात पुरेसे पुरावे नसल्यानं त्यांना दहशतवादी घोषित केलं जाऊ नये, अशी भूमिका सुरक्षा परिषदेच्या तीन स्थायी आणि दोन अस्थायी सदस्यांनी घेतली. तसं आवाहन त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेला केलं. याआधीही पाकिस्ताननं वेनुमाधव डोंगरा आणि अजय मिस्त्री या दोन भारतीयांना दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न केला. पण तो अमेरिकेनं उधळून लावला होता.

भारत-चीनमध्ये तिसऱ्या दिवशीही तणावपूर्ण चर्चा, भारताने दिला ड्रॅगनला तिसरा झटका

पाकिस्ताननं एकूण ४ भारतीयांना दहशतवादी घोषित करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तान अफगाणिस्तानातील विकास कामांशी संबंधित भारतीय नागरिकांवर नजर ठेवून आहे. या नागरिकांवर बिनबुडाचे आरोप करून त्यांचा संबंध पाकिस्तानमधील दहशतवादी घटनांशी जोडण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू आहेत. मात्र पाकिस्तानचे चारही प्रस्ताव सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी रोखले. त्यामुळे पाकिस्तान तोंडावर पडला. 

मोदी सरकारचा मोठा निर्णय; पबजीसह ११८ मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी

याआधीही पाकिस्तानला अशा प्रकारे भारतीय नागरिकांविरोधात पुरेसे पुरावे देण्यात अपयश आलं होतं. आता पुन्हा एकदा पाकिस्तानला जोरदार झटका बसला आहे. यानंतर संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी टी. एस. त्रिमूर्तींनी एक ट्विट करून पाकिस्तानवर निशाणा साधला. 'दहशतवादाला धार्मिक रंग देण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न सुरक्षा परिषदेनं हाणून पाडला. पाकिस्तानची नापाक खेळी रोखणाऱ्या देशांचे आम्ही आभारी आहोत,' असं त्रिमूर्तींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Web Title: pakistan China Nefarious Move Against India In Unsc Fail To Designate Two Indians As Terrorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.