पाकिस्ताननं बेरोजगारीचा उच्चांक गाठला; शिपायाच्या एका जागेसाठी १५ लाख लोकांनी केला अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 11:16 PM2021-09-27T23:16:38+5:302021-09-27T23:18:11+5:30
unemployment rate : पीआयडीईने बेरोजगारीच्या वाढत्या दराचे भीषण चित्र उघड केले आहे आणि म्हटले आहे की, देशातील किमान 24 टक्के सुशिक्षित लोक सध्या बेरोजगार आहेत.
इस्लामाबाद : पाकिस्तानामधील इम्रान खान सरकार लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरले आहे. मात्र, इम्रान सरकारला तरुणांना दहशतवाद्यांची पथके बनवण्यात अधिक रस आहे. सोमवारी पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स (PIDE) च्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानमध्ये बेरोजगारीचा दर 16 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान सरकारच्या 6.5 टक्के दाव्याच्या विरुद्ध आहे. (pakistan contrary to imran khan govt claim pakistan faces far higher unemployment rate)
पाकिस्तानमध्ये 24 टक्के सुशिक्षित लोक बेरोजगार
डॉन वृत्तपत्रानुसार, पीआयडीईने बेरोजगारीच्या वाढत्या दराचे भीषण चित्र उघड केले आहे आणि म्हटले आहे की, देशातील किमान 24 टक्के सुशिक्षित लोक सध्या बेरोजगार आहेत. नियोजन आणि विकासविषयक सिनेट स्थायी समितीला दिलेल्या माहितीमध्ये पीआयडीईने म्हटले आहे की, देशभरातील 40 टक्के सुशिक्षित महिला (पदवीधर किंवा पदवीधर) बेरोजगार आहेत.
चांगली नोकरी मिळाली नाही तर MPhil साठी प्रवेश
पीआयडीईच्या अधिकार्यांनी सांगितले की, काही सुशिक्षित लोक आपले शिक्षण चालू ठेवण्यासाठी MPhil च्या शिक्षणासाठी प्रवेश घेतात. कारण, ते चांगल्या नोकऱ्या मिळवण्यासाठी धडपडत असतात. यामुळे बेरोजगारीचे प्रमाण देखील कमी झाले, कारण ते आकडेवारीमध्ये समाविष्ट केले जात नाही.
शिपाई पदासाठी 15 लाख लोकांचा अर्ज
अधिकार्यांचा हवाला देत डॉन वृत्तपत्राने म्हटले की, नुकत्याच जाहिरात दिलेल्या उच्च न्यायालयातील एका शिपाई पदासाठी किमान 15 लाख लोकांनी अर्ज केला होता. अधिकाऱ्यांनी सांगितले की, नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये MPhil पदवीधारकही आहेत.
याचबरोबर, पीआयडीईच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सरकारी पातळीवर कोणतेही संशोधन केले जात नाही आणि असे सर्व अभ्यास परदेशातून केले गेले. समितीने म्हटले की, देशात अनेक संशोधन संस्था चालू आहेत, परंतु संशोधनाची उद्दिष्टे पूर्ण होत नाहीत.
विशेष म्हणजे, कोणत्याही सामान्य व्यक्तीसोबत लग्न केल्यास राजकुमारी माको हिचा शाही दर्जा समाप्त होईल. #japan#japaneseprincesshttps://t.co/R5WimSdaM1
— Lokmat (@MiLOKMAT) September 27, 2021
सरकारच्या दाव्यांनुसार, 6.9 टक्के बेरोजगारी
दरम्यान, पाकिस्तानची बेरोजगारी 2017-18 मध्ये 5.8 टक्क्यांवरून 2018-19 मध्ये 6.9 टक्क्यांपर्यंत वाढली आहे, असे पाकिस्तानच्या ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स (पीबीएस) ने प्रकाशित केलेल्या श्रम बल सर्वेक्षण (एलएफएस) ने म्हटले आहे.
सातत्याने बेरोजगारीत वाढ
पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ सत्तेवर आल्यानंतर पहिल्या वर्षी पुरुष आणि महिला दोघांच्या बेरोजगारीत वाढ झाली, पुरुष बेरोजगारीचा दर 5.1 टक्क्यांवरून 5.9 टक्के आणि महिला बेरोजगारीचा दर 8.3 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत वाढला. याबाबतची माहिती डॉन वृत्तपत्राने दिली आहे.