पाकिस्तान - 'अफगाण गर्ल'ला जामीन देण्यास न्यायालयाचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2016 12:33 PM2016-11-02T12:33:13+5:302016-11-02T12:33:13+5:30

जगप्रसिद्ध अफगाण गर्ल शरबत बिवी ऊर्फ शरबत गुला यांना जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. पेशावरमधील न्यायालयात करण्यात आलेला जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

Pakistan - The Court's denial of bail to 'Afghan girl' | पाकिस्तान - 'अफगाण गर्ल'ला जामीन देण्यास न्यायालयाचा नकार

पाकिस्तान - 'अफगाण गर्ल'ला जामीन देण्यास न्यायालयाचा नकार

Next
>ऑनलाइन लोकमत
इस्लमाबाद, दि. 2 - जगप्रसिद्ध अफगाण गर्ल शरबत बिवी ऊर्फ शरबत गुला यांना जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. पेशावरमधील न्यायालयात करण्यात आलेला जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. शरबत बिवी यांना 'हेपॅटिटिस सी' असून त्यांनी चार मुले आहेत. पतीचं निधन झाल्यानंतर त्यांची सर्व जबाबदारी त्यांच्यावरच आहे. न्यायालयात ही बाजू मांडत जामीन देण्याची विनंती करण्यात आली, मात्र न्यायालयाने ती नाकारली. 
 
‘नॅशनल जिओग्राफिक’ या ख्यातकीर्त नियतकालिकाने ३० वर्षांपूर्वी मुखपृष्ठावर छायाचित्र छापल्याने, सोविएत संघाने कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तानातून पाकिस्तानात आलेल्या लाखो निर्वासितांची ओळख ठरलेल्या आणि हिरव्या, भेदक डोळ्यांमुळे ‘ मोनालिसा ऑफ अफगाणिस्तान’ म्हणून जगभर प्रसिध्दी पावलेल्या शरबत बिवी ऊर्फ शरबत गुला यांना पाकिस्तान सरकारने फसवणूक व भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अटक केली आहे.
 
(जगप्रसिद्ध ‘अफगाण गर्ल’ला अटक)
 
बिवी यांना 'हेपॅटिटिस सी'चा त्रास होत असून, उच्च रक्तदाबदेखील आहे. यासाठी त्यांनी व्यवस्थित उपचाराची गरज आहे. त्यांच्या मुलांची जबाबदारी त्यांच्यावर असून त्यांना जामीन देण्यात यावा अशी बाजू शरबत बिवी यांच्या वकिलाने न्यायालयात मांडली होती. 
 
बनावट दस्तावेजांच्या आधारे पाकिस्तानी नागरिकत्वाचे ओळखपत्र मिळविल्याच्या गुन्ह्याबद्दल पाकिस्तानच्या संघीय तपास यंत्रणेने (एफआयए) शरबत बिवीला पेशावर शहराच्या नोथिया भागातील तिच्या राहत्या घरातून अटक केली. राष्ट्रीय संगणकीकृत ओळखपत्र देण्याचे काम करणाऱ्या ‘नॅशनल डेटाबेस अ‍ॅण्ड रजिस्ट्रेशन अ‍ॅथॉरिटी’ने (एनडीआरए) केलेल्या फिर्यादीवरून दोन वर्षे तपास केल्यानंतर तपास यंत्रणेने ही कारवाई केली. शरबत बिवीकडे पाकिस्तान आणि अफगाण या दोन्ही देशांची नागरिक ओळखपत्रे मिळाली. ती जप्त करण्यात आली.
 
फोटो जगभर गाजला
तालिबानींच्या बंदुकांना न जुमानता स्वत: शिक्षण घेऊन मुलींच्या शिक्षणासाठी झटणारी मलाला नोबेल शांतता पुरस्कार मिळाल्यावर अफगाणिस्तानची ओळख म्हणून जगापुढे येण्याआधी शरबत गुला ही जगाला परिचित झाली. ‘नॅशनल जिओग्राफिक’चे छायाचित्रकार स्टिव्ह मॅक्करी यांनी १९८४ मध्ये शरबत गुलाचे छायाचित्र घेतले तेव्हा ती अवघी १२ वर्षांची होती व पेशावर शहराच्या वेशीवर अफगाण निर्वासितांच्या छावणीत राहात होती.

Web Title: Pakistan - The Court's denial of bail to 'Afghan girl'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.