कधी कधी मुलांच्या हातून घडून जातं; श्रीलंकन व्यक्तीच्या हत्येवर पाकच्या मंत्र्याचं धक्कादायक वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 03:23 PM2021-12-06T15:23:44+5:302021-12-06T15:24:07+5:30
सियालकोटमध्ये शेकडोंच्या गर्दीनं एका श्रीलंकन नागरिकाला बेदम मारहाण केली. त्यामध्ये संबंधिताचा मृत्यू झाला होता.
पाकिस्तानात मॉब लिचिंगची एक धक्कादायक घटना घडली होती. सियालकोटमध्ये शेकडोंच्या गर्दीनं एका श्रीलंकन नागरिकाला बेदम मारहाण केली. त्यामध्ये संबंधिताचा मृत्यू झाला. त्यानंतर गर्दीनं त्या व्यक्तीचा मृतदेह पेटवला. सियालकोटमधील वझिराबाद मार्गावर ही घटना घडली. दरम्यान, यावर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री परवेझ खटक (Defence Minister of Pakistan Pervaiz Khattak) यांचं धक्कादायक वक्तव्य समोर आलं आहे.
परवेझ खटक यांनी श्रीलंकन नागरिकाची हत्या करणाऱ्यांचा बचाव करत ती लहान मुलं असून उत्स्फुर्त प्रतिक्रिया असल्याचं सांगितलं. "ती लहान मुलं आहेत, ते जोशात येतात आणि उत्स्फुर्तपणे काम करून मोकळे होतात. याचा अर्थ देश विनाशाच्या मार्गावर जातोय असं नाही. प्रत्येकाचे वेगळे विचार आहेत. इस्लाम विरोधी असल्याचं त्यानं घोषणा दिल्या. परंतु त्यांची प्रतिक्रिया उत्स्फुर्त होती," असंही ते म्हणाले.
The Defence Minister of Pakistan Pervaiz Khattak justifies the murder of #SrilankanManager, Priyantha Kumara who was brutally murdered by a violent mob. Khattak says that kids do such things in passion which doesn't mean things are bad.#Sialkot#Sialkot_incident#Sialkottragedypic.twitter.com/lWTaYQn8bD
— Hamza Azhar Salam (@HamzaAzhrSalam) December 5, 2021
लोकांना समजवा
"या घटनेला जे रुप दिलं जातंय तसं काहीच नाही. मी देखील एखादी उत्स्फुर्त प्रतिक्रिया देऊ शकतो. परंतु सर्वकाही खराब झालंय असा त्याचा अर्थ होत नाही," असंही ते म्हणाले. प्रियंता कुमारा दियावदनाची मॉब लिंचिंग एक सामान्य घटना असल्याचंही ते म्हणाले.
काय आहे प्रकरण?
खासगी कंपनीत काम करत असलेल्या मजुरांनी कारखानाच्या व्यवस्थापकावर हल्ला केला. त्यानंतर मोठी गर्दी जमली. सगळ्यांनी व्यवस्थापकाला बेदम मारलं. त्यामुळे त्याचा जीव गेला. यानंतर गर्दीनं त्याला पेटवून दिलं. पोलीस या घटनेचा तपास करत असून गर्दीच्या क्रूरतेचा बळी ठरलेल्या व्यक्तीचं नाव प्रियांथा कुमारा असं आहे. प्रियांथा कुमारा यांनी मोहम्मद पैगंबर यांची निंदा केल्याचा आरोप कारखान्यात काम करणाऱ्या मजुरांनी केला, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली होती.