काश्मीरप्रश्नी सर्वत्र तोंडघशी पडलेल्या पाकिस्तानचा अमेरिकेच्या वक्तव्यावरून तिळपापड, म्हटलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 03:53 PM2021-02-12T15:53:07+5:302021-02-12T15:58:05+5:30
Pakistan on Jammu Kashmir : अमेरिकेच्या जम्मू काश्मीरबाबतच्या वक्तव्यावर पाकिस्ताननं घेतला आक्षेप
काश्मीरप्रश्नी पाकिस्तानला अनेकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर तोंडघशी पडावं लागलं आहे. दरम्यान, काश्मीरबद्दल अमेरिकेच्या एका वक्तव्यावरून पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. काश्मीरप्रश्नी अमेरिकेच्या वक्तव्यावरून पाकिस्तानचा संताप व्यक्त केला आहे. अमेरिकेनं केलेल्या एका ट्वीटमधघ्ये जम्मू काश्मीर हा वादग्रस्त भाग असल्याचा उल्लेख न केल्याचं सांगत पाकिस्ताननं त्यावर आक्षेप घेतला आहे.
अमेरिकेनं गुरूवारी एक ट्वीट केलं होतं. यामध्ये त्यांनी जम्मू काश्मीरबद्दल आपल्या धोरणांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचं म्हटलं होतं. "आम्ही जम्मू काश्मीरमध्ये ४ जी इंटरनेट सुविधा सुरू करण्याच्या निर्णयाचं स्वागत करतो. हे स्थानिकांसाठी उचलण्यात आलेलं एक उत्तम पाऊल आहे. या क्षेत्रातील परिस्थिती सामान्य ठेवण्यासाठी राजकीय आणि आर्थिक प्रगती कायम राहिल अशी आम्ही आशा करतो," असं ट्वीट अमेरिकेनं केलं होतं.
We are disappointed to note the reference to Jammu & Kashmir in the U.S. Department of State’s tweet regarding resumption of 4G mobile internet in #IIOJK. The reference is inconsistent with disputed status of J&K as recognized by numerous UNSC resolutions & int’l community. 1/3
— Spokesperson 🇵🇰 MoFA (@ForeignOfficePk) February 12, 2021
अमेरिकेच्या या ट्वीटमध्ये जम्मू काश्मीर हा वादग्रस्त भाग असा उल्लेख न करण्यावर पाकिस्ताननं आक्षेप घेतला. "अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या ट्वीटमध्ये ज्याप्रकारे काश्मीरचा उल्लेख करण्यात आला आहे त्यामुळे पाकिस्तान निराशा झाली आहे. काश्मीरचा वादग्रस्त क्षेत्र असा उल्लेख न करणं हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे प्रस्ताव आणि आंतरराष्ट्रीय समुदायांच्या विरोधातील आहे," असं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जाहिर चौधरी यांनी म्हटलं आहे. काश्मीरबाबत अमेरिकेच्या धोरणात कोणताही बदल होणार नाही, असं अमेरिकेते परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी सांगितलं. परंतु पाकिस्तानच्या आक्षेपानंतरही ट्वीटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यापूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना एक आवाहन केलं होतं. काश्मीरचं सत्य बायडनं प्रशासनानं दुर्लक्षित करू नये असंही त्यांनी म्हटलं होतं.