मोदी सरकारचा निर्णय अवलंबण्याचा पाकिस्तानी अर्थतज्ज्ञांचा सल्ला, करावी लागेल ‘ही’ मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 03:27 PM2023-04-27T15:27:21+5:302023-04-27T15:28:06+5:30

पाकिस्तान आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तान अनेक देशांकडे मदतही मागत आहे.

Pakistan Economic Crisis Advice to follow Modi government s demonitisation decision in Pakistan big announcement will have to be made Pakistan economist | मोदी सरकारचा निर्णय अवलंबण्याचा पाकिस्तानी अर्थतज्ज्ञांचा सल्ला, करावी लागेल ‘ही’ मोठी घोषणा

मोदी सरकारचा निर्णय अवलंबण्याचा पाकिस्तानी अर्थतज्ज्ञांचा सल्ला, करावी लागेल ‘ही’ मोठी घोषणा

googlenewsNext

Pakistan Economic Crisis : पाकिस्तान आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा (Pakistan Economic Crisis) सामना करत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तान अनेक देशांकडे मदतही मागत आहे. परंतु आतापर्यंत चीनशिवाय पाकिस्तानला कोणत्याही देशानं मदतीचा हात पुढे केलेला नाही. परंतु आता एका पाकिस्तानी अर्थतज्ज्ञानं (Pakistani Economist) देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी मोठा सल्ला दिला आहे. पाकिस्तान सरकारनं ५००० रुपयांची नोट तात्काळ बंद करावी (Demonetize 5000 Rupee Note) असं त्यांनी सूचवलं आहे.

बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी अर्थतज्ज्ञ अम्मार खान यांनी आपली बुडती अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी पाकिस्ताननं त्वरित ५ हजार रूपयांच्या नोटांचा वापर बंद करण्याचा सल्ला दिला आहे. खान यांच्या पॉडकास्टचा काही भाग व्हायरल होत आहे. भारताच्या या सूत्रानं जबरदस्त कामगिरी केली आहे. यामुळे त्यांच्या कर संकलनातही वाढ झाली असल्याचं ते यात म्हणाले. विशेष म्हणजे नोव्हेंबर २०१६ मध्ये भारतानं ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता.

सर्क्युलेशनमध्ये ८ लाख कोटी
“पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत कोणत्याही तपासाशिवाय तब्बल ८ लाख कोटी रूपये सर्क्युलेशनमध्ये आहेत. यामुळे रोख रकमेचा वापर वाढत आहे. यामुळे कोणत्याही प्रकारचा करही मिळत नाही. हाच पैसा आर्थिक संकाटाचा सामना करत असलेल्या देशातील महागाई आणखी वाढवण्यास महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पाकिस्तानमध्ये बहुतांश व्यवहार रोख रकमेद्वारे केले जातात. अमेरिकन डॉलर्सच्या मदतीनं आयात केली जाते. अशातच त्याचा कोणताही हिशोब राहत नाही,” असं अम्मार खान म्हणाले.

…तर मदत होईल
“या ५ हजार रुपयांच्या नोटांचा कोणताही उपयोग होत नाही. देशातील बँकांमध्ये रोखीची समस्या आहे आणि त्यामुळे त्या कर्ज देण्यास सक्षम नाहीत. ५ रुपयांच्या नोटांच्या माध्यमातून जर ८ लाख कोटी रूपये बँकांकडे परत आले तर तुमच्याकडे सरप्लस पैसे उपलब्ध होती. जे आर्थिक संकटातून बाहेर येण्यास मदत करतील,” असंही ते म्हणाले.

५ हजार रुपयांच्या नोट पाकिस्तानात बंद करण्याची आवश्यकता आहे. याचा विरोधही केला जाईल. परंतु या नोटा सामान्यपणे धनवान लोकांकडेच आहेत. त्यामुळे सामान्यांना समस्यांचा सामना करावा लागणार नाही, असंही खान म्हणाले. 

Web Title: Pakistan Economic Crisis Advice to follow Modi government s demonitisation decision in Pakistan big announcement will have to be made Pakistan economist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.