पाकिस्तानमध्ये आर्थिक 'अंधार'! बाजार, रेस्टॉरंट्स लवकर बंद; सरकारी कर्मचाऱ्यांवर 'वर्क फ्रॉम होम'ची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 11:12 PM2023-01-03T23:12:08+5:302023-01-03T23:12:35+5:30

पाकिस्तानची आर्थिक अवस्था दिवसेंदिवस दिवाळखोरीच्या दिशेनं वाटचाल करत आहे.

pakistan economic crisis markets restaurants and wedding halls to close early government staff told to work from home | पाकिस्तानमध्ये आर्थिक 'अंधार'! बाजार, रेस्टॉरंट्स लवकर बंद; सरकारी कर्मचाऱ्यांवर 'वर्क फ्रॉम होम'ची वेळ

पाकिस्तानमध्ये आर्थिक 'अंधार'! बाजार, रेस्टॉरंट्स लवकर बंद; सरकारी कर्मचाऱ्यांवर 'वर्क फ्रॉम होम'ची वेळ

googlenewsNext

पाकिस्तानची आर्थिक अवस्था दिवसेंदिवस दिवाळखोरीच्या दिशेनं वाटचाल करत आहे. पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. वीज संकट ही पाकिस्तानात मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या शाहबाज सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ऊर्जा संवर्धन योजनेंतर्गत सरकारने सर्व मॉल्स आणि मार्केट रात्री ८.३० वाजेपर्यंत बंद झाले पाहिजेत, असे आदेश दिले आहेत. तसंच लग्न समारंभाचे हॉल देखील रात्री लवकर बंद करण्यास सांगण्यात आलं आहे. याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'चे आदेश दिले आहेत. देशाचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी याबाबत माहिती दिली आहे. या निर्णयावर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केल्याचे ते म्हणाले.

संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले, आर्थिक संकटात देशाचे सुमारे ६२ अब्ज पाकिस्तानी रुपये वाचवण्याचं सरकराचं उद्दिष्ट आहे. महागाईच्या दबावामुळे पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. जिओ न्यूजच्या अहवालानुसार, पाकिस्तानचा ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) डिसेंबरमध्ये २४.५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे, जो गेल्या वर्षी याच कालावधीसाठी १२.३ टक्के इतका होता.

पाकिस्तानात वाढती महागाई
पाकिस्तानच्या चलनवाढीचा दर अर्थ मंत्रालयाच्या अपेक्षेप्रमाणे नव्हता असे वृत्त जिओ न्यूजने दिले आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर आंतरराष्ट्रीय वस्तूंच्या किमतींवर झालेला परिणाम, देशातील विनाशकारी पुरामुळे पिकांचे झालेले नुकसान आणि चलनाची घसरण यामुळे पाकिस्तानातील महागाई वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

अहवालानुसार, गेल्या महिन्यात देशातील खाद्यपदार्थांच्या महागाईत शहरांमध्ये ३२.७ टक्के आणि गावे/शहरांमध्ये ३७.९ टक्क्यांनी वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. हे गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत नाशवंत अन्न उत्पादनांच्या किमतीत लक्षणीय वाढ दर्शवते.

पाकिस्तान सध्या गंभीर संकटात
दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर म्हणाले, पाकिस्तान सध्या गंभीर टप्प्यातून जात आहे. देशासमोर अर्थव्यवस्था आणि दहशतवाद हे मोठे आव्हान आहे. मुनीर यांनी दहशतवाद आणि अर्थव्यवस्था या दुहेरी समस्यांना तोंड देण्यासाठी सर्व पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केलं आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीतही लाइट नाही
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ यांनी सरकारच्या निर्णयाची माहिती देताना सर्वांना वीज वाचवण्याचं आवाहन तर केलंच. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक देखील सकाळी घेण्यात आली आणि वीजेचा वापर करण्यात आला नसल्याचंही सांगितलं. 

Web Title: pakistan economic crisis markets restaurants and wedding halls to close early government staff told to work from home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.