Pakistan Economic Crisis: कंगाल पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! तब्बल २४ अब्ज रूपयांचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 10:48 AM2023-02-13T10:48:55+5:302023-02-13T10:49:47+5:30

दुष्काळात तेरावा महिना ही म्हण सध्या पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीसाठी चपखस बसते असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

Pakistan economic crisis pak railway loss crossed 24 billion salary upheld employees angry frustration all over | Pakistan Economic Crisis: कंगाल पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! तब्बल २४ अब्ज रूपयांचं नुकसान

Pakistan Economic Crisis: कंगाल पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! तब्बल २४ अब्ज रूपयांचं नुकसान

googlenewsNext

Pakistan Economic Crisis दुष्काळात तेरावा महिना ही म्हण सध्या पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीसाठी चपखस बसते असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. सर्व बाजूंनी आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला आणखी एका मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. इतर देशांकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर अवलंबून असलेले पाकिस्तानचे रेल्वे खातेही (Pakistan Railway Department) आता कंगाल होण्याच्या मार्गावर पोहोचले आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, गेल्या सहा महिन्यांत त्यांचे तब्बल २४ अब्ज रुपयांचे नुकसान झाले आहे. पाकिस्तान रेल्वेच्या कमाईत ५० टक्क्यांपर्यंत घसरण झाली असून, त्यामुळे कर्मचारी वर्गाचे पगारही थकल्याची माहिती मिळाली आहे.

पाकिस्तान रेल्वेचा तोटा २४ अब्ज रुपयांवर!

पाकिस्तानी वृत्तपत्र द एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या मते, बलुचिस्तानच्या एका मंत्र्याने पाकिस्तान रेल्वेचे (Pakistan Railway) २४ अब्ज नुकसान झाल्याचे सांगितले आहे, तरीही पाकिस्तान सरकार हा तोटा केवळ ३ अब्जांपर्यंतच असल्याचे सांगत आहे. पाकिस्तानचे कायदा आणि राज्यमंत्री शहादत अवान यांनी सांगितले की, जुलै २०२२ ते डिसेंबर २०२२ पर्यंत रेल्वेचे सुमारे ३ अब्ज रुपयांचे नुकसान झाले आहे.

पाकिस्तानला IMF च्या बेलआउट पॅकेज प्रतीक्षा

आर्थिक संकटांचा सामना करत असलेला पाकिस्तान हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)च्या आर्थिक मदतीची वाट पाहत आहे आणि पाकिस्तान बेलआउट पॅकेज अंतर्गत IMF कडून कर्ज मिळविण्याचा सतत प्रयत्न करत आहे. पाक सरकारला आशा आहे की यावेळी IMF कडून महत्त्वपूर्ण निधी अनलॉक करण्यासाठी $६.५ अब्ज कर्ज कार्यक्रमाच्या अटींवर लवकरच IMF मिशनशी करार होईल.

पाकिस्तान रेल्वेच्या कमाईत ५० टक्क्यांनी घट

पाकिस्तानी रेल्वेच्या कमाईत घसरण होण्यामागे त्यांची बिघडलेली स्थिती कारणीभूत आहे, असे जाणकारांचे मत आहे. अहवालानुसार, पाकिस्तान रेल्वेच्या कमाईत ५० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. पाकिस्तान रेल्वेने या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत २८.२६३ अब्ज रुपये कमावले आहेत. तर या कालावधीत ५२.९९ अब्ज रुपये खर्च केले आहेत.

परकीय चलन साठा $३ दशलक्षपेक्षाही कमी

स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने अहवाल दिला आहे की, ३ फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात पाकिस्तानचा केंद्रीय बँकेकडे असलेली परकीय चलन साठा ५.५ टक्के किंवा $१७० दशलक्ष डॉलरने कमी होऊन $२.९१ अब्ज झाला आहे. यानंतर संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती अधिकच बिकट झाली आहे. द न्यूजच्या अहवालानुसार, पाकिस्तानकडे एकूण ८.५४ अब्ज डॉलर्सचा साठा आहे, ज्यामध्ये व्यावसायिक बँकांमधील ५.६२ अब्ज डॉलर्सचा समावेश आहे.

Web Title: Pakistan economic crisis pak railway loss crossed 24 billion salary upheld employees angry frustration all over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.