Pakistan Economy Crisis : पाकिस्तानच्या अडचणीत वाढ! कर्ज मिळेना, IMF ने ठेवली नवी अट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 01:38 PM2023-03-26T13:38:42+5:302023-03-26T13:39:30+5:30

Pakistan Economy Crisis : पाकिस्तान गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटात सापडला आहे.

pakistan economy crisis imf sets new condition for pakistan for bailout package external assurance | Pakistan Economy Crisis : पाकिस्तानच्या अडचणीत वाढ! कर्ज मिळेना, IMF ने ठेवली नवी अट

Pakistan Economy Crisis : पाकिस्तानच्या अडचणीत वाढ! कर्ज मिळेना, IMF ने ठेवली नवी अट

googlenewsNext

Pakistan Economy Crisis : पाकिस्तान गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटात सापडला आहे. पाकिस्तान अनेक दिवसापासून आयएफएम कडून कर्जासाठी  प्रयत्न करत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच कर्जासाठी आयएमएफसोबत चर्चा सुरू आहे, जर ही चर्चा यशस्वी झाली तर IMF पाकिस्तानला १.१ मिलियन कर्ज देणार आहे. 

पाकिस्तान सरकारने अनेक आर्थिक सुधारणा लागू केल्या आहेत. यात इंधनाचे दर वाढवण्यास, तसेच कर वाढवणे ​​आणि सबसिडी कमी करण्यास सांगितले आहे. हे सर्व पाकिस्तानने लागू करुन अजुनही कर्जाची रक्कम मिळालेली नाही. आता आयएमएफ ने पाकिस्तानसमोर नवी अट ठेवली आहे.

'वडिलांच्या अंत्ययात्रेमागे माझा भाऊ...', प्रियांका गांधींनी सांगितली ३२ वर्षे जुनी गोष्ट

एका अहवालानुसार, इस्लामाबादला बेलआउट टँच सोडण्यासाठी पुढील पाऊल उचलण्यापूर्वी आयएफएमने आता बाह्य वित्तपुरवठा आश्वासनांची मागणी केली आहे. IMF आणि पाकिस्तान यांच्यात वाटाघाटी होत असलेला निधी २०१९ मध्ये मंजूर झालेल्या ६.५ अब्ज डॉलर बेलआउट पॅकेजचा भाग आहे. हा निधी पाकिस्तानला डिफॉल्ट होण्यापासून वाचवू शकतो.

'बाह्य भागीदारांकडून वेळेवर आर्थिक सहाय्य हे अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांसाठी आणि पुनरावलोकन यशस्वी होण्यासाठी महत्त्वपूर्ण असेल. अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे याची खात्री करणे ही सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे आयएमएफने सांगितले आहे. काही उरलेल्या मुद्यांची पूर्तता झाल्यानंतर स्टाफ लेव्हल अॅग्रीमेंट होईल. पाकिस्तानसोबत पुढची पावले उचलण्यास सक्षम होण्यासाठी आपल्याकडे ती आर्थिक हमी असल्याची खात्री करणे आवश्यक आहे, असंही आयएफएमने म्हटले आहे. 

काही दिवसापूर्वी आयएफएमने श्रीलंकेला मदत जाहीर केली आहे. आयएमएफने मदत केली तर या करारामुळे पाकिस्तानच्या परकीय चलनाचा साठा वाढवण्यासाठी इतर द्विपक्षीय आणि बहुपक्षीय निधीचा मार्गही खुला होईल. दरम्यान, कर्जदात्याने श्रीलंका आणि बांगलादेशसाठी मदत जाहीर केली आहे.

Web Title: pakistan economy crisis imf sets new condition for pakistan for bailout package external assurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.