इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ, कधीही होऊ शकते अटक!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 08:42 AM2022-08-22T08:42:09+5:302022-08-22T08:42:30+5:30

Imran Khan : इम्रान खान यांच्यावर 20 ऑगस्ट रोजी आयजी आणि न्यायाधीशांना धमकी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

pakistan ex prime minister imran khan booked under anti terror law may arrest anytime | इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ, कधीही होऊ शकते अटक!

इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ, कधीही होऊ शकते अटक!

Next

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना कधीही अटक होऊ शकते. इम्रान खानविरोधात दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. इम्रान खान यांच्यावर 20 ऑगस्ट रोजी आयजी आणि न्यायाधीशांना धमकी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशिरा इस्लामाबादच्या आयजींनी अटक वॉरंट जारी केल्याची माहिती दिली आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी 20 ऑगस्ट रोजी शाहबाज गिल यांच्या (Shahbaz Gill) अटकेविरोधात इस्लामाबादमध्ये रॅली काढली होती. या रॅलीत हजारो लोक सहभागी झाले होते. या रॅलीचे सर्व टीव्ही वृत्तवाहिन्यांनी प्रक्षेपण केले. या रॅलीत इम्रान खान यांच्यावर 20 ऑगस्ट रोजी इस्लामाबादमधील रॅलीत देशाचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आणि पाकिस्तानची शांतता व्यवस्थेला बाधा आणण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. इतकेच नाही तर इस्लामाबादच्या आयजीसह अनेक पोलीस अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोपही आहे.

पाकिस्तानच्या जिओ न्यूजनुसार, माजी पंतप्रधान इम्रान खान यांना कधीही अटक केली जाऊ शकते किंवा त्यांना नजरकैदेत ठेवले जाऊ शकते. इस्लामाबादमधील एफ-9 पार्कमध्ये शनिवारी एका भाषणादरम्यान पोलीस, न्यायाधीश, पाकिस्तान निवडणूक आयोग आणि राजकीय प्रतिस्पर्ध्यांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इम्रान खान यांच्या भाषणामुळे पोलीस, न्यायाधीश आणि देशात भीती आणि अनिश्चितता निर्माण झाली होती. त्यामुळे इस्लामाबाद पोलिसांच्या उच्चपदस्थ अधिकारी आणि न्यायाधीशांना धमकावणे आणि देशातील शांतता भंग केल्याप्रकरणी दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत (Anti Terror Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरीकडे, इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) ने शाहबाज सरकारविरोधात (Shahbaz Sharif Govt) मोर्चा काढला आहे. इम्रान खान यांच्या घराबाहेर त्यांच्या समर्थकांचा मेळावाही झाला आणि पक्षाने इस्लामाबादकडे मोर्चाचा नारा दिला. पाकिस्तानच्या विविध भागातून इम्रान खान यांचे समर्थक इस्लामाबादला रवाना झाले. इम्रान खान यांना अटक करण्याची कोणाची हिंमत नाही, असे पीटीआयचे मोठे नेते परवेझ खट्टक यांनी म्हटले आहे. दरम्यान, इम्रान खानची माजी पत्नी रेहम खान हिने पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले आहे.

Web Title: pakistan ex prime minister imran khan booked under anti terror law may arrest anytime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.