...म्हणून पाकिस्तानात महिलेचे डोळे फोडून पाय कापले
By admin | Published: November 3, 2016 01:07 PM2016-11-03T13:07:00+5:302016-11-03T13:18:09+5:30
. जखमी महिलेला मुल्तानच्या निशतार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती गंभीर आहे. बहिणीबरोबर इतके क्रूर वर्तन करण्याआधी..
Next
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. ३ - मुलीच्या अपहरणामध्ये सहभागी असल्याच्या संशयावरुन दोन भावांनी आपल्याच बहिणीचे डोळे फोडून तिचे पाय कापल्याची धक्कादायक घटना पाकिस्तानातील पंजाब प्रांतात घडली आहे.
लाहोरपासून ४०० किमी अंतरावर मुझफ्फरघरमध्ये मंगळवार ही घटना घडली. जखमी महिलेला मुल्तानच्या निशतार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती गंभीर आहे.
बहिणीबरोबर इतके क्रूर वर्तन करण्याआधी या दोन भावांनी पोलिसात मुलीचे अपहरण केल्याची तक्रार नोंदवली होती. पीडित महिला ४० वर्षांची आहे. आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे पण कोणालाही अटक झालेली नाही.