पाकिस्तान हे अपयशी राष्ट्र, भारताने फटकारले
By admin | Published: September 28, 2016 01:20 AM2016-09-28T01:20:25+5:302016-09-28T01:20:25+5:30
पाकिस्तान हे अपयशी राष्ट्र असून ते स्वत:च्याच लोकांवर अत्याचार करीत असताना इतरांना मात्र लोकशाही, मानवीहक्क आणि सहिष्णुता यावर प्रवचन देते, अशा शब्दांत भारताने
संयुक्त राष्ट्रे : पाकिस्तान हे अपयशी राष्ट्र असून ते स्वत:च्याच लोकांवर अत्याचार करीत असताना इतरांना मात्र लोकशाही, मानवीहक्क आणि सहिष्णुता यावर प्रवचन देते, अशा शब्दांत भारताने मंगळवारी पाकिस्तानला फटकारले. जम्मू आणि काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग आहे हे त्याला मोठ्या आणि स्पष्ट आवाजात सांगणे आवश्यक आहे, असे संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रथम सचिव इनाम गंभीर म्हणाल्या.
पाकिस्तानला दहशतवादाविरोधात लढण्यासाठी अब्जावधी डॉलरची मदत मिळत असतानाही त्या देशात दहशतवादाची भरभराट का होत आहे याचे स्पष्टीकरण पाकिस्तान करू शकते का, असे गंभीर म्हणाल्या. संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानच्या स्थायी दूत मलिहा लोधी यांनी प्रतिउत्तर देण्याच्या अधिकाराचा वापर करताना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सोमवारी केलेल्या भाषणाला उत्तर दिले. त्यांनी स्वराज यांनी केलेले आरोप निराधार असल्याचे आणि काश्मीर हा कधीही भारताचे अविभाज्य अंग नव्हते व नसेल, असे नमूद केले. (वृत्तसंस्था)