पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का, १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 01:20 PM2024-01-30T13:20:01+5:302024-01-30T13:20:27+5:30
Imran Khan Jail: पाकिस्तानच्या विशेष न्यायालयाने ठोठवली शिक्षा
Imran Khan Shah Mahmood Qureshi sentenced to 10 years in jail in cipher case: पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे प्रमुख आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का बसला आहे. गोपनीय डिप्लोमॅटिक केबल्स (सायफर) लीक करणे आणि गुप्तता कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाकिस्तानच्या विशेष न्यायालयानेइम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी या दोघांना १० वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठवण्यात आली आहे. पाकिस्तानातील विशेष न्यायालयाने आज या संदर्भातील निर्णय दिला. २३ ऑक्टोबर २०२३ रोजी इम्रान खान आणि शाह महमूद कुरेशी यांना दोषी ठरवण्यात आले होते. हे प्रकरण एका डिप्लोमॅटिक दस्तऐवजाशी संबंधित असून ते दस्तऐवज इम्रान खान यांच्याकडून कथितपणे गायब झाले होते.
PTI founder Imran Khan & Shah Mehmood Qureshi have been given 10-year prison sentences in the Cipher case, reports Pakistan media.
— ANI (@ANI) January 30, 2024
(file photos) pic.twitter.com/EieM801kgm
पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफने (पीटीआय) आरोप केला आहे की, दस्तऐवजात अमेरिकेने इम्रान खान यांना पदावरून हटवण्याची धमकी दिली होती. इम्रान खान यांना ५ ऑगस्टला तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आणि तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने २९ ऑगस्टला त्यांची शिक्षा स्थगित केली होती, परंतु Cipher प्रकरणात न्यायालयीन कोठडी असल्यामुळे ते तुरुंगातच होते. यादरम्यान, ३० सप्टेंबर रोजी फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एफआयए) विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते, ज्यामध्ये कुरेशी यांचे सायफर प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून नाव देण्यात आले होते.
Cipher केस म्हणजे काय?
इम्रान खान आणि शाह महमूद कुरेशी यांच्याविरुद्धचा हा सायफरचा खटला राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. इम्रान खान यांच्यावर सर्वोच्च गुप्त माहितीचा वैयक्तिक वापर केल्याचा आरोप आहे. सत्तेतून हकालपट्टी झाल्यानंतर इम्रान यांनी आपल्या हकालपट्टीमागे अमेरिका हात असल्याचा आरोप केला होता. यासाठी वॉशिंग्टनमधील पाकिस्तानी दूतावासाने त्यांना एक केबल (टेप किंवा गुप्त माहिती) पाठवल्याचे इम्रानने सांगितले. इम्रान खान यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी वादग्रस्त मुत्सद्दी संभाषण सार्वजनिक केले होते. त्याला ‘Cipher’ असे म्हणतात.
पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे प्रमुख आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का बसला आहे. गोपनीय डिप्लोमॅटिक केबल्स (सायफर) लीक करणे आणि गुप्तता कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाकिस्तानच्या विशेष न्यायालयाने इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी या दोघांना १० वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठवण्यात आली आहे. पाकिस्तानातील विशेष न्यायालयाने आज या संदर्भातील निर्णय दिला. २३ ऑक्टोबर २०२३ रोजी इम्रान खान आणि शाह महमूद कुरेशी यांना दोषी ठरवण्यात आले होते. हे प्रकरण एका डिप्लोमॅटिक दस्तऐवजाशी संबंधित असून ते दस्तऐवज इम्रान खान यांच्याकडून कथितपणे गायब झाले होते.