पीएम मोदींच्या अमेरिका दौऱ्यावर पाकिस्तान जळायला लागला, लढाऊ विमानांच्या ऑफरमुळे संतापला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 16:40 IST2025-02-14T16:38:30+5:302025-02-14T16:40:43+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली.

पीएम मोदींच्या अमेरिका दौऱ्यावर पाकिस्तान जळायला लागला, लढाऊ विमानांच्या ऑफरमुळे संतापला
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. काल ट्रम्प आणि मोदी यांच्यात चर्चा झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला अत्याधुनिक लढाऊ विमान F-35 देण्याचे ऑफर दिली. त्यांनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यापार वाढवण्याचे वचन दिले. पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील चर्चेमुळे दोन्ही देशांमधील संबंध नवीन उंचीवर पोहोचले आहेत.
भारत आणि अमेरिकेतील संबंध पाहून पाकिस्तान चिडला आहे. या भेटीवर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शफकत अली खान म्हणाले की, लडाऊ विमानाच्या विक्रिबद्दल खूप चिंता आहे. "अशा हालचालींमुळे प्रदेशातील लष्करी असंतुलन वाढते आणि धोरणात्मक स्थिरता बिघडते. प्रदेशात कायमस्वरूपी शांततेची उद्दिष्टे साध्य करण्यात ते उपयुक्त नाहीत."
PM मोदींसमोर डोनाल्ड ट्रम्प यांनी ठेवला चीनबद्दलचा प्रस्ताव, पण भारताने दिला नकार!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला एफ-३५ लढाऊ विमान खरेदी करण्याची ऑफर दिली आहे. "या वर्षापासून आम्ही भारताला लष्करी विक्री अनेक अब्ज डॉलर्सने वाढवू," असे ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींसोबत पत्रकार परिषदेत सांगितले. "आम्ही भारताला एफ-३५ स्टेल्थ लढाऊ विमाने पुरवण्याचा मार्गही मोकळा करत आहोत," असे ट्रम्प म्हणाले.
इस्रायल आणि जपानच्या एका विशेष क्लबमध्ये सामील होईल
भारत नाटो सहयोगी देश, इस्रायल आणि जपानच्या एका विशेष क्लबमध्ये सामील होईल, त्यांना F-35 खरेदी करण्याची परवानगी असेल, जे सुपरसॉनिक वेगाने उड्डाण करू शकते आणि कोणत्याही डिटेक्शनशिवाय उडू शकते. सध्या भारत जुन्या रशियन लढाऊ विमानांच्या ताफ्यावर तसेच फ्रेंच बनावटीच्या राफेल विमानांवर अवलंबून आहे.
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी परतल्यानंतर व्हाईट हाऊसला भेट देणारे चौथे जागतिक नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतासह सर्व देशांवर परस्पर कर लादण्याची घोषणा केल्यानंतर काही तासांतच ही बैठक झाली.