पाकिस्तानच्या हाती घबाड लागले; सौदीने या गोष्टीसाठी दोन अब्ज डॉलर मोजले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 02:33 PM2024-10-11T14:33:54+5:302024-10-11T14:34:27+5:30
सौदी अरेबियामध्ये वाळवंटी भाग असल्याने तिथे शेती होत नाही. सौदीकडे पैसा आहे परंतू शेतीयोग्य जमीन नाही.
दहशतवाद्यांना पोसणारा पाकिस्तान कंगाल झाला आहे. यामुळे सर्व देशांकडे तो हात पसरवत आहे. अशातच सौदीसोबत पाकिस्तानने मोठी डील केली आहे. सौदी पाकिस्तानमध्ये दोन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. याच्या बदल्यात पाकिस्तान हजारो एकर सुपिक जमीन सौदीला शेतीसाठी देणार आहे.
सौदी अरेबियामध्ये वाळवंटी भाग असल्याने तिथे शेती होत नाही. सौदीकडे पैसा आहे परंतू शेतीयोग्य जमीन नाही. पाकिस्तानला पैशांची गरज तर सौदीला शेतमालाची, यामुळे ही डील सौदीने केली आहे. दोन्ही देशांमध्ये याबाबतचा करार झाला आहे. सौदीचे गुंतवणूक मंत्री खालिद बिन अब्दुल अजीज अल फलीह आणि सेना प्रमुख जनरल असीम मुनीर हे या एमओयूवर सहीवेळी उपस्थित होते.
सौदीचे प्रतिनिधीमंडळ तीन दिवसांच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधानांनी सौदीचा क्राऊन प्रिंस सलमान यांची स्तुती केली. अलीकडेच पाकिस्तानला आयएमएफकडून बेलआउट पॅकेज मिळाले आहे. ही शेवटची वेळ असेल असा विश्वास शाहबाज यांनी व्यक्त केला.
या करारांमध्ये कृषी क्षेत्रात 70 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक, सौदी अरेबियामध्ये सेमीकंडक्टर चिप उत्पादन, वस्त्रोद्योगाची स्थापना, तेल पाइपलाइन प्रकल्प आदी असणार आहे. याच्या बदल्यात सौदीने पाकिस्तानकडून 10 हजार एकर जमीन शेतीसाठी घेतली आहे.
सौदी अरेबियाच्या अन्नाची गरज भागवण्यासाठी खानवालमध्ये १० हजार एकर जमीन दिली जाणार आहे. पिके, फळे आणि भाजीपाला उत्पादित करून सौदीला निर्यात केला जाणार आहे.