पाकिस्तानमध्ये बंदूकधा-यांचा शाळेत घुसून गोळीबार
By admin | Published: October 31, 2016 11:13 AM2016-10-31T11:13:00+5:302016-10-31T11:34:49+5:30
पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील बहावलनगर येथे खासगी शाळेत दोन बंदुकधारी घुसले आहेत. शाळेत घुसताच त्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती मिळाली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 31 - पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील बहावलनगर येथे खासगी शाळेत दोन बंदुकधारी घुसले होते. शाळेत घुसताच त्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली होती. बहावलनगरमधील हरुनाबाद परिसरात ही शाळा आहे. गोळीबार होत असल्याची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. सुदैवाने गोळीबारात कोणतीही जिवीतहानी झाली नसून मोठी दुर्घटना टळली.
पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी पोहोचताच बंदूकधा-यांनी घटनास्थळावरुन पळ काढला असल्याची माहिती द एक्स्प्रेस ट्रिब्यूनने दिली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी सुखरुप बाहेर काढण्यात आलं असून शाळेचा सुरक्षारक्षक गोळीबारात जखमी झाला आहे.
गेल्याच आठवड्यात पाकिस्तानमधील क्वेटा येथील पोलीस ट्रेनिंग सेंटरवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 61 पोलिसांचा मृत्यू झाला होता तर 165 जण जखमी झाले होते. क्वेटा येथे सारयाब रोडवर असलेल्या पोलीस ट्रेनिंग सेंटरवर तीन दहशतवादी रात्री गोळीबार करत सेंटरमध्ये घुसले. यावेळी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देत पोलिसांनी सुद्धा गोळीबार केला.
मात्र दहशतवादी सेंटरमध्ये घुसल्यामुळे त्यांनी केलेल्या हल्ल्यात 61 पोलिसांचा मृत्यू झाला. पोलिसांनी तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.