भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे पाककडे
By admin | Published: March 10, 2015 11:17 PM2015-03-10T23:17:29+5:302015-03-11T00:33:07+5:30
इंटरअॅक्टिव्ह इन्फोग्राफिकने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानकडे भारतापेक्षाही जास्त अण्वस्त्रे आहेत. पाकिस्तानकडे गेल्या वर्षी १२० अण्वस्त्रे होती, तर भारताकडे ११०.
वॉशिंग्टन : इंटरअॅक्टिव्ह इन्फोग्राफिकने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानकडे भारतापेक्षाही जास्त अण्वस्त्रे आहेत. पाकिस्तानकडे गेल्या वर्षी १२० अण्वस्त्रे होती, तर भारताकडे ११०.
१९४५ मध्ये शिकागो विद्यापीठात वैज्ञानिकांनी इंटरअॅक्टिव्ह इन्फोग्राफिकची स्थापना केली. जगात किती अण्वस्त्रे आहेत याची व अण्वस्त्रांच्या इतिहासाची माहिती या संस्थेकडून मिळते. संस्थेने १९८७ मध्ये जगातील अण्वस्त्रांची माहिती उपलब्ध केली होती.
या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार १९८० मध्ये ६५ हजार अण्वस्त्रे होती; पण सध्या त्यात कपात झाली आहे. अमेरिका व रशियाकडे प्रत्येकी पाच-पाच हजार, फ्रान्स ३००, चीन २५०, ब्रिटन २२५, इस्रायल ८० अण्वस्त्रे आहेत. उत्तर कोरियाने २००६, २००९ व २०१३ मध्ये अण्वस्त्रांची चाचणी घेतली होती. जगात नेमकी किती अण्वस्त्रे आहेत याची माहिती जगाला असेल, असे मला तरी वाटत नाही, असे अधिकारी रेचल ब्रॉन्सन यांनी सांगितले. अण्वस्त्रांची चाचणी कोणत्या देशाने कधी केली व त्यांच्याकडे आज किती अण्वस्त्रे आहेत याची माहिती आम्ही घेत असतो, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)