युद्धसरावासाठीही पाककडे पैसे नाहीत; इंधन तेलाच्या टंचाईमुळे नामुष्कीची स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 07:52 AM2023-07-08T07:52:41+5:302023-07-08T07:53:00+5:30
पाकिस्तानी लष्कर युद्धसरावात टी-८० रणगाड्यांचा वापर करते.
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या बिकट आर्थिक अवस्थेचा त्याच्या लष्करालाही फटका बसला आहे. त्या देशात इंधनाचा राखीव साठाही कमी झाला असून त्यामुळे पाकिस्तानी लष्कर येत्या डिसेंबरपर्यंत युद्धसराव करू शकणार नाही. यासंदर्भात लष्कराच्या प्रशिक्षण विभागाच्या प्रमुखांनी सर्व विभागांना एक पत्र लिहिले आहे.
एका संरक्षण तज्ज्ञाने सांगितले की, पाकिस्तानी लष्कर युद्धसरावात टी-८० रणगाड्यांचा वापर करते. या रणगाड्यांना प्रतिकिलोमीटर २ लिटर इंधन तेल लागते. युद्धसरावासाठी अधिक प्रमाणात इंधन तेलाची आवश्यकता असते. मात्र, इतके इंधन तेल उपलब्ध करून देणे शक्य नसल्यामुळे युद्धसराव पुढे ढकलण्यात आला आहे. पाकिस्तानला सध्या अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. (वृत्तसंस्था)
अन्नधान्यही कमी केले
पाक लष्कराला केवळ इंधन तेलच नव्हे तर अन्नधान्याचाही कमी पुरवठा होत आहे. लष्कराला मिळणाऱ्या निधीमध्येही कपात झाल्याने सैनिकांनी दर शुक्रवारी लष्करी वाहनांचा उपयोग करणे टाळावे अशा सूचनाही देण्यात आल्या होत्या.