अडचणीच्यावेळी पाकिस्तानने मदत केली, आता त्यांनाच तालिबानने धमकी दिली; लाल मशीद ऑपरेशनपासून सुरू झाले वैर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 15:31 IST2025-01-02T15:30:22+5:302025-01-02T15:31:38+5:30
तालिबानला १९९४ मध्ये मजबूत बनवण्याठी पाकिस्तानने मोठी मदत केली होती.

अडचणीच्यावेळी पाकिस्तानने मदत केली, आता त्यांनाच तालिबानने धमकी दिली; लाल मशीद ऑपरेशनपासून सुरू झाले वैर
पाकिस्तान आणि तालिबान या दोन्हीमध्ये आधी खूप जवळचे संबंध होते. पाकिस्तानशिवायतालिबान्यांचे काहीच होत नव्हते. त्यांना पाकिस्तानच पैसे पुरवत होता. पण, डिसेंबर महिन्यात अफगाणिस्तानच्या पाक्तिका प्रांतामध्ये पाकिस्तानने मोठा हवाई हल्ला केला. या हल्ल्यात पाकिस्तानने तालिबान्यांचे एक प्रशिक्षण केंद्र होते. या हल्ल्यात ४६ जणांचा मृ्त्यू झाला. यात सर्वात जास्त लहान मुले आणि महिला होत्या. या घटनेमुळेच पाकिस्तान आणि तालिबानमध्ये मोठा वाद सुरू झाला.
२०२५ मध्ये उड्डाण, २०२४ मध्ये जमिनीवर उतरलं विमान, कसा घडला हा टाइम ट्रॅव्हलचा चमत्कार?
या हल्ल्यानंतर तालिबानने पाकिस्तानचा बदला घेण्याचे ठरवले आणि अवघ्या चार दिवसांनी पाकिस्तानच्या सीमेवर प्रत्युत्तरादाखल हल्ला केला. या हल्ल्यात १९ पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा तालिबानने केला आहे, तर ३ अफगाण नागरिकांनाही आपला जीव गमवावा लागला आहे.
तालिबानची स्थापना १९९४ मध्ये अफगाणिस्तानातील कंदाहारमध्ये झाली. पाकिस्तानने त्यांना संघटित करण्यात आणि मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तालिबानला सुरुवातीपासूनच पाकिस्तानकडून मोठा पाठिंबा मिळू लागला. आयएसआयने अनेक दशकांपासून आर्थिक आणि लष्करी मदत देऊन तालिबानला सांभाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
१९९६ मध्ये, पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि युएई ने अफगाणिस्तानच्या तालिबानच्या इस्लामिक अमिरातीला कायदेशीर सरकार म्हणून मान्यता दिली. नेहमीच तालिबानच्या पाठीशी असलेला पाकिस्तान आज शत्रू बनला आहे. अफगाणिस्तानात सत्ता हाती घेतल्यानंतर पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात हल्ले वाढले आहेत.
तालिबानच्या विरोधानंतर पाकिस्तानने तालिबानच्या स्थापनेतील आपली भूमिका वारंवार नाकारली आहे. पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातील युद्धाची खरी सुरुवात २००७ मध्ये पाकिस्तानातील लाल मशीद ऑपरेशन होती. इस्लामाबादची लाल मशीद कट्टर इस्लामी कारवायांच्या केंद्रस्थानी होती. येथूनच दहशतवादी संघटनांना पाठबळ मिळाले.
२००७ मध्ये लाल मशिदीच्या विद्यार्थ्यांनी इस्लामाबादमधील मसाज सेंटरवर हल्ला करून ९ जणांचे अपहरण केले होते. यानंतर ३ जुलै २००७ रोजी पाकिस्तानी लष्कराने ऑपरेशन सायलेन्स सुरू केले. या कारवाईत १०० हून अधिक लोक मारले गेले. यानंतर पाकिस्तानमध्ये तहरीक-ए-पाकिस्तान चा जन्म झाला. यानंतर पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी हल्ले झाले.