"राजीनामा, अविश्वास प्रस्ताव आणि निवडणूक"; इम्रान खान म्हणाले मला फक्त तीनच पर्याय दिले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 08:05 PM2022-04-02T20:05:59+5:302022-04-02T20:06:25+5:30

पाकिस्तानचे पंतप्रधान (Pakistan PM) इम्रान खान (Imran Khan) यांची खुर्ची सध्या धोक्यात आहे.

pakistan hindi news imran khan says opposition establishment gave him 3 choices resignation trust vote or polls | "राजीनामा, अविश्वास प्रस्ताव आणि निवडणूक"; इम्रान खान म्हणाले मला फक्त तीनच पर्याय दिले

"राजीनामा, अविश्वास प्रस्ताव आणि निवडणूक"; इम्रान खान म्हणाले मला फक्त तीनच पर्याय दिले

Next

पाकिस्तानचे पंतप्रधान (Pakistan PM) इम्रान खान (Imran Khan) यांची खुर्ची सध्या धोक्यात आहे. ३ एप्रिल रोजी त्यांच्यावरील अविश्वास प्रस्तावावर मतदान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यापूर्वी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी पुन्हा एकदा एक मोठं वक्तव्य केलं आहे. विरोधी पक्षाद्वारे संसदेत अविश्वास प्रस्ताव सादर केल्यानंतर 'अस्थापनेनं' आपल्याला केवळ राजीनामा, अविश्वास प्रस्तावावर मतदान आणि निवडणूक हे तीनच पर्याय दिल्याचं ते म्हणाले. 

अस्थापनेचा इशारा कोणाकडे होता हे मात्र त्यांनी सांगितलं आहे. पाकिस्तानच्या ७३ वर्षांपेक्षा अधिकच्या इतिहासात अर्ध्या पेक्षा अधिक कालावधीत लष्कराचीच राजवट होती. पाकिस्तानच्या संरक्षण आणि परराष्ट्र धोरणाच्या प्रकरणांमध्ये आतापर्यंत लष्कराचा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप होता. सध्या पाकिस्तानात सुरू असलेल्या राजकीय संकटादरम्यान लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी कथितरित्या या आठवड्यात पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतली.

एआरव्हाय न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांना विरोधी पक्ष, सत्तारुढ पक्ष किंवा कोणत्या अन्य पक्षाकडून वेळेपूर्वी निवडणुका किंवा राजीनाम्याचा पर्याय दिला होता का असा सवाल केला. यावेळी त्यांनी आपल्यासमोर तीन पर्याय ठेवल्याचं म्हटलं. "मी राजीनामा देण्याच्या बाबत विचारही करू शकत नाही आणि जोपर्यंत अविश्वास प्रस्तावाचा प्रश्न आहे मी अखेरच्या क्षणापर्यंत लढण्यावर विश्वास ठेवतो त्यामुळए आम्ही निवडणुकीला सर्वोत्तम पर्याय म्हटलं," असं इम्रान खान म्हणाले.

"आम्ही त्यांच्यासोबत राहू शकत नाही"
"अविश्वास प्रस्ताव जरी पारित झाला नाही, तरी आम्ही कोणत्याही बंडखोरासोबत सरकार चावू शकत नाही. नव्यानंच निवडणुका घेण्यात याव्या हेच पाकिस्तानसाठी चांगलं असेल," असंही ते एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

Web Title: pakistan hindi news imran khan says opposition establishment gave him 3 choices resignation trust vote or polls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.