पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या! IMF-पाकिस्तान करार अयशस्वी, गरिबी आणखी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 06:52 PM2023-02-11T18:52:03+5:302023-02-11T18:54:21+5:30

पाकिस्तानमध्ये गेल्या काही महिन्यांपासून महागाई विरोधात लढत आहे, दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. पीठ, डाळ, तेल याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

pakistan imf pakistan deal on bailout package fails foreign reserves below 3 million | पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या! IMF-पाकिस्तान करार अयशस्वी, गरिबी आणखी वाढणार

पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या! IMF-पाकिस्तान करार अयशस्वी, गरिबी आणखी वाढणार

googlenewsNext

पाकिस्तानमध्ये गेल्या काही महिन्यांपासून महागाई विरोधात लढत आहे, दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. पीठ, डाळ, तेल याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पाकिस्तानचे परकीय चलन 3 अब्ज डॉलरच्या खाली आले आहे, त्यामुळे आर्थिक मंदी टाळण्यासाठी पाकिस्तानला आता आर्थिक मदत आणि बेलआउट पॅकेजची गरज आहे, पण, IMF-पाकिस्तानच्या बेलआउट पॅकेजच्या करारामुळे हे पॅकेज सहजासहजी मिळत नाही. या करारावर बोलणी सुरू होती यात आता पाकिस्तानला अपयश आले आहे. IMF ने पाकिस्तानसमोर कडक अटी ठेवल्या आहेत.

IMF च्या टीमने 10 दिवसांसाठी इस्लामाबादला भेट दिली. या करारात पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनी नेतृत्व केले. IMF टीम 10 दिवसांपासून पाकिस्तानमध्ये आहे, पण, दोन्ही बाजूंनी झालेल्या चर्चेचा कोणताही परिणाम झाला नाही. अर्थमंत्री इशाक दार यांनी IMF मिशनच्या प्रमुखांना 'संरक्षण बजेटमध्ये कपात' करण्याची अट काढून टाकण्याची विनंती केली, त्यानंतर IMF प्रमुखांनी चर्चा थांबवली आणि करारावर स्वाक्षरी न करता पाकिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला. लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर अधिकृत दौऱ्यावर यूकेमध्ये आहेत आणि सरकारला त्यांच्याशी संरक्षण बजेटवर चर्चा करण्यासाठी थोडा वेळ हवा आहे. आयएमएफ आपल्या अटींवर ठाम राहिला, असं सांगण्यात येत आहे.

Earthquake in Turkey: भूकंपग्रस्त तुर्कीमध्ये ऑस्ट्रियाने अचानक मदतकार्य थांबविले; कारण काय?

देशाची अर्थव्यवस्था गंभीर संकटात आहे, पेमेंट संतुलन संकट आणि बाह्य कर्जाच्या उच्च पातळीमुळे प्रभावित आहे. दरम्यान, 3 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानचा परकीय चलन साठा 5.5 टक्के किंवा 170 दशलक्षने  डॉलर घसरून 2.91 अब्ज डॉलर झाला, यात व्यावसायिक बँकांमधील 5.62 अब्ज डॉलरचा समावेश आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने गुरुवारी ही माहिती दिली. देशात एकूण 8.54 अब्ज डॉलरचा साठा शिल्लक आहे.

Web Title: pakistan imf pakistan deal on bailout package fails foreign reserves below 3 million

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.